4 May 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

DLF Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 220 टक्के परतावा, मागील 9 दिवसांत 19% परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

DLF Share Price

DLF Share Price | मागील 9 दिवसांपासून शेअर बाजारात काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तेजीच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स देखील वेगात वाढत आहेत. मागील 9 दिवसात निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये 10 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. याच निर्देशांकाचा भाग असलेल्या DLF कंपनीच्या शेअरमध्ये मागील 9 दिवसांत 19 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये DLF कंपनीचे वेटेज 30 टक्के आहे. डीएलएफ कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी 1.07 टक्के वाढीसह 410.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक किंमत पातळी 418.50 रुपये आहे. (DLF Limited)

गुंतवणुकीवर परतावा :
DLF कंपनीच्या स्टॉकने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 220 टक्के परतावा कमावून दिला आहे. कंपनीवरील कर्जाचे प्रमाण सतत कमी होत आहे. मागील 5 वर्षात DLF कंपनीच्या नफ्यात 27 टक्के CAGR दराने वाढ होत आहे. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची वार्षिक 14 टक्के या दराने वाढत आहे. DLF कंपनी आपल्या उपकंपन्या आणि सहयोगी कंपन्या आणि संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करते. जमीन ओळखण्यापासून ते बांधकाम आणि प्रकल्पाच्या विपणनापर्यंतच्या सर्व प्रक्रियेत कंपनीचा प्रत्यक्ष सहभाग असतो. DLF कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे.

रियल्टी शेअर्समध्ये वाढीचे कारण :
RBI ने रेपो दर वाढ केली नाही, याचा सकारात्मक परिणाम रिअल्टी शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे. गृहकर्जाच्या व्याज दरातील वाढ थांबवल्यास देशात मालमत्तेची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज तज्ञांनी लावला आहे. रेपो दर न वाढवल्यास विशेषत : परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न विभागातील घरांची मागणी वाढेल. याशिवाय भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना कार्यक्रमासाठू खूप मोठी तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

त्यामुळे पुढील तिमाहीत परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीत मागणी वाढू शकते. ट्रेंडलाइनच्या डेटानुसार , DLF कंपनीच्या स्टॉक वर शेअर बाजारातील तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. आणि तज्ञांनी गुंतवणुकदारांना स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DLF Share Price on 15 April 2023.

हॅशटॅग्स

DLF Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x