15 May 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Brightcom Group Share Price Today | गुंतवणूदारांना करोडपती करणाऱ्या शेअरमध्ये आता काय चाललंय, स्टॉक रोज पडतोय, पुढे काय होणार?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price Today | ‘बाइटकॉम ग्रुप’ गुंतवणूकदारांना दररोज एक नवीन झटका बसत आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे सतत लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना जबरदस्त तोटा सहन करावा लागत आहे. आजही बाइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के घसरणीसह 12.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी देखील ‘बाइटकॉम ग्रुप’ कंपनीत मोठी गुतवणूक केली होती. (Brightcom Group Limited)

कंपनीवर सेबीची नजर :
नुकताच ‘बाइटकॉम ग्रुप’ कंपनी सेबीच्या कचाट्यात सापडली आहे. बाइटकॉम ग्रुप कंपनी सेबीने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात सेबीच्या कारणे दाखवा नोटीसवर कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती दिली आहे. कंपनीच्या अंतर्गत कारभारात आर्थिक फसवणुक आणि घोटाळा निदर्शनास आलं आहे. ‘बाइटकॉम ग्रुप’ कंपनी शेअर बाजारात SMM LT स्टेज -1 वर आहे.

गुंतवणूकदार कंगाल झाले :
17 डिसेंबर 2021 रोजी ‘बाइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 12.65 रुपये किमतीवर आला आहे. या कंपनीच्या शेअरच्या किमतीत कमालीची घसरगुंडी सुरू आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनपासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटच्या विळख्यात अडकले आहेत.

मागील दीड वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 90 टक्क्यांहून अधिक नुकसान केले आहेत. दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी ‘बाइटकॉम ग्रुप’ कंपनीचे 1.24 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. ‘बाइटकॉम ग्रुप’ कंपनीचा व्यवसाय अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, यूके, फ्रान्स, जर्मनी, अशा अनेक मोठ्या देशात विस्तारलेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price Today on 20 April 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x