14 May 2024 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक Buy करावा की Sell? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील? IPO GMP | लॉटरी लागणार! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त परतावा देणार, GMP संकेत
x

मुरजी पटेल व केसरबेन पटेल यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नगरसेवक पद रद्दच

Kesarben Patel. Murji Patel, Kesarben Patel, BJP

मुंबई : जातीच्या दाखल्याअभावी पालिकेतील एकूण ५ नगरसेवकांवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत त्यांचे नगरसेवक पद रद्द केलं. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांचे खंडपीठ निकाल जाहीर केला होता. त्यामुळे इतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना ३, कॉंग्रेस १ आणि समाजवादी पक्षाच्या १ उमेदवारांना नगरसेवकपदाची मोठी लॉटरी लागू लागली.

मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ६७ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुधा सिंग, प्रभाग क्रमांक ७६ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यापूर्वीच फेटाळले होते.

दरम्यान अंधेरी भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल आणि त्यांची पत्नी नगरसेविका केसरबेन पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्बत केलं आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वेतील भाजप नैतृत्व जवळपास संपुष्टात आलं आहे आणि आता भाजप येथून नव्या चेहऱ्याचा शोध घेईल असं म्हटलं जात आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत देखील स्थानिक भाजपकडून प्रचारासाठी सहकार्य मिळत नसल्याने शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेऊन भाजपवर दबाव वाढवला आहे. त्यामुळे इथे भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये जुळत नसल्याचं वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x