14 May 2024 4:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Union Bank of India Share Price | बँक FD सोडा! युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी करा, 1 वर्षात दिला 101.72 टक्के परतावा

Union Bank of India Share Price

Union Bank of India Share Price | ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ च्या शेअरमध्ये मंगळवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पडझड पाहायला मिळाली होती. तर आजही बुधवार दिनांक 10 मे रोजी हा स्टॉक 2.22 टक्के घसरणीसह 70.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या बँकेने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. बँकेच्या नफ्यात 93 टक्क्यांनी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. युनियन बँक ऑफ इंडीयाच्या व्याज उत्पन्नात एकूण 22 टक्के YoY वाढ नोंदवली गेली आहे.

मोतीलाल ओसवाल फर्म निकालानंतर युनियन बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकवर असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2023 मध्ये प्रति इक्विटी शेअर 3 रुपये लाभांशही वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील एका वर्षात या बँकिंग शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया शेअरची लक्ष किंमत :
मोतीलाल ओसवाल फर्मने युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच तज्ञांनी प्रति शेअर लक्ष किंमत 95 रुपये निश्चित केली आहे. 8 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 74 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात हा स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा 28-29 टक्क्यांनी वाढू शकतो असे तज्ञ म्हणतात.

बँकेची तिमाही कामगिरी :
मार्च तिमाहीत युनियन बँक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 93 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. व्याज उत्पन्न तिमाही आधारावर किंचित प्रमाणात घटले आहे. यामध्ये मार्जिन 0.23 टक्क्यांनी घसरले आहे. बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा पाहायला मिळाली असून GNPA/NNPA गुणोत्तरमध्ये अनुक्रमे 7.5%/1.7% पर्यंत सुधारणा पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 तिमाहीत पुनर्रचित पुस्तक मूल्य 2 टक्के कमी झाले आहे, जे FY23 तिसऱ्या तिमाहीत 2.38 टक्के होती.

मार्जिनमधे किंचित घट झाल्यामुळे एनआयआय अपेक्षेपेक्षा कमकुवत झाला होता. तथापि, राइट-ऑफ खात्यांमधून झालेल्या चांगल्या पुनर्प्राप्तीमुळे बँकेची कमाई सुधारली आहे. FY25 पर्यंत, बँकेच्या मालमत्तेवर 0.9 टक्के परतावा आणि 15.7 टक्के इक्विटीवर परतावा मिळणे अपेक्षित आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाने जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत 93.3 टक्क्यांच्या वाढीसह 2,782 कोटी रुपयये निव्वळ नफा कमावला आहे. या बँकेचे व्याज उत्पन्न 21.9 टक्क्यांच्या वाढीसह वाढून 8,251 कोटी रुपयेवर पोहचले आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत गैर-व्याज उत्पन्न देखील 62.48 टक्क्यांच्या वाढीसह 5,269 कोटी रुपयेवर पोहोचले आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 3 रुपये लाभांश वाटप केले होते. शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रमाणे गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी लाभांश 30 टक्के लाभांश मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Union Bank of India Share Price Today on 10 May 2023.

हॅशटॅग्स

Union Bank of India Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x