17 May 2024 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या छुप्या शेअरवरने 7000 टक्के परतावा प्लस 606 टक्के डिव्हीडंड, खरेदी करणार?

Tata Elxsi Share Price

Tata Elxsi Share Price | ‘टाटा एलेक्सी’ या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. हा तिमाहीत कंपनीने 201.5 कोटी रुपये नफा कमावला आहे. टाटा एलेक्सी कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी वाढला आहे. टाटा एलेक्सी कंपनीने मागील वर्षी मार्च 2022 तिमाहीत 160.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7001.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 10,760.40 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के घसरणीसह 6,789.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लाभांश घोषणा :
टाटा एलेक्सी कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति शेअर 606 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 60.60 रुपये लाभांश वाटप करणार आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत टाटा एलेक्सी कंपनीने 23 टक्के वाढीसह 838 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच कालावधीत टाटा एलेक्सी कंपनीने 681.7 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत या कंपनीचा EBITDA 249.5 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत 221.2 कोटी रुपये होता.

10 वर्षात दिला 7000 टक्के परतावा :
टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 7000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 17 मे 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 97.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 मे 2023 रोजी हा स्टॉक 7001.85 रुपये किमतीवर पोहचला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 71.92 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Elxsi Share Price today on 19 May 2023.

हॅशटॅग्स

#Tata Elxsi Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x