2 May 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

ICRA Share Price | ICRA शेअर्स गुंतवणुकदारांना मिळणार 1300 टक्क्यांचा भरघोस डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख पाहा

Highlights:

  • ICRA Share Price
  • कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ
  • गुंतवणुकदारांना 1300 टक्के लाभांश
  • मागील 6 महिन्यातील परतावा
ICRA Share Price

ICRA Share Price | प्रसिद्ध रेटिंग एजन्सी ICRA लिमिटेडने मागील आठवड्यात बुधवारी आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. मार्च 2023 तिमाहीत ICRA लिमिटेड कंपनीने 38.40 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ

एक वर्षभरापूर्वी याच तिमाहीत ICRA लिमिटेडने 33.40 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 15 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी ICRA लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.67 टक्के वाढीसह 4,941.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणुकदारांना 1300 टक्के लाभांश

ICRA लिमिटेड कंपनीने मार्च तिमाही निकालासोबत आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ICRA लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 1300 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

ICRA लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 40 रुपये लाभांश वितरीत करण्याची निर्णय घेतला आहे. याशिवाय कंपनी गुंतवणुकदारांना 90 रुपये विशेष लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना कंपनीकडून एकूण 130 रुपयांचा लाभांश मिळणार आहे.

मागील वर्षी ICRA लिमिटेडने शेअर धारकांना 28 रुपये लाभांश वाटप केला होता. यावर्षी ICRA लाभांश म्हणून 125.50 कोटी रुपये खर्च करणार आहे. मागील वर्षी कंपनीने लाभांश वाटप करण्यासाठी 27 कोटी रुपये खर्च केले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ICRA लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 4760.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 6 महिन्यातील परतावा

मागील 6 महिन्यांत ICRA लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये 12 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. ICRA ने लाभांश वाटपासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीने 28 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. ICRA चे एकूण बाजार भांडवल 4,59843 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ICRA Share Price today on 29 May 2023.

 

हॅशटॅग्स

ICRA Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x