6 May 2024 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला, आता 60 टक्के लाभांश देणार

Highlights:

  • Bajaj Steel Industries Share Price
  • 60 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा
  • गुंतवणूकदारांना 1500 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला
  • प्रवर्तक आपले भाग भांडवल प्रमाण वाढवत आहेत
Bajaj Steel Industries Share Price

Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनी मागील आठवड्यात शुक्रवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले. मार्च 2023 तिमाहीत बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीने 1566.06 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाही कालावधीत बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीने 519.44 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील एका वर्षात बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनी आपल्या शेअर धारकांना 128.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीने Q4 निकालांसह लाभांश वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे.

60 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा

27 मे 2023 रोजी बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या तिमाही निकालासह 5 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 60 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रत्येक शेअरवर 3 रुपये लाभांश वाटप केला जाईल. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के वाढीसह 1,250.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणूकदारांना 1500 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बजाज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के घसरणीसह 1291.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 128 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 46.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 80.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2020 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1500 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

प्रवर्तक आपले भाग भांडवल प्रमाण वाढवत आहेत

बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीचे प्रवर्तक आपले भाग भांडवल प्रमाण वाढवत आहेत. सप्टेंबर 2022 पर्यंत बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 42.73 टक्के भाग भांडवल धारण केले होते. जे डिसेंबर 2022 मध्ये वाढून 45.76 टक्केवर पोहचले होते. मार्च 2023 तिमाहीत बजाज स्टील इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांनी आपले भाग भांडवल 47.69 टक्के पर्यंत वाढवले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bajaj Steel Industries Share Price today on 30 May 2023.

हॅशटॅग्स

Bajaj Steel Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x