18 May 2024 8:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Rolex Rings Share Price | रोलेक्स रिंग्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांची मोठी कमाई, आता नवीन टार्गेट प्राईस जाहीर

Highlights:

  • Rolex Rings Share Price
  • लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले
  • शेअरची टार्गेट प्राईस
  • रोलेक्स रिंग्ज कंपनीबद्दल थोडक्यात
Rolex Rings Share Price

Rolex Rings Share Price | शेअर बाजारात अनेक कंपनीचे IPO लाँच झाले होते, ज्यानी पहिल्याच दिवशी आपल्या शेअर धारकांना श्रीमंत बनवले. त्यापैकी एक आहे, रोलेक्स रिंग्ज. 2021 मध्ये गुजरात स्थित रोलेक्स रिंग्ज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी लाँच करण्यात आला होता.

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले

या कंपनीच्या शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले होते. सध्या या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के वाढीसह 1,947.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअरची टार्गेट प्राईस

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलच्या अहवालानुसार रोलेक्स रिंग्ज कंपनीचे शेअर्स 2500 रुपयेपर्यंत वाढू शकतात. सध्या हा स्टॉक 1947 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1,264 रुपये होती. 11 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,196 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,221 कोटी रुपये आहे.

रोलेक्स रिंग्ज कंपनीबद्दल थोडक्यात

रोलेक्स रिंग्स कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 880 रुपये ते 900 रुपये जाहीर करण्यात आली होती. या स्टॉकची लिस्टिंग 1000 रुपये पेक्षा जास्त किमतीवर झाली होती. या IPO मध्ये कंपनीने 56 कोटी रुपयेचे फ्रेश शेअर्स इश्यू केले होते. आणि Rivendell PE LLC कंपनीने 675 कोटी रुपयेचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले होते.

जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत रोलेक्स रिंग्स कंपनीने 299.48 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर त्यात कंपनीचा निव्वळ नफा 46.41 कोटी रुपये होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 57.64 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आणि सार्वजनिक शेअरहोल्डिंग 42.36 टक्के होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rolex Rings Share Price today on 31 May 2023.

हॅशटॅग्स

Rolex rings share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x