6 May 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

LIC Share Price | एलआयसी शेअर 36 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा

Highlights:

  • LIC Share Price 
  • एलआयसी शेअरची सध्याची किंमत
  • एलआयसी शेअर संदर्भात तज्ञांचा सल्ला
  • एलआयसी शेअरची टार्गेट प्राईस
LIC Share Price

LIC Share Price | लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होऊन एक वर्ष पूर्ण झाला आहे. LIC कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना स्टॉक लिस्टिंगनंतर मोठे नुकसान झाले आहे. एलआयसीच्या सर्व गुंतवणूकदारांना तब्बल 2.23 लाख कोटी रुपये नुकसान सहन करावे लागले आहे. लिस्टिंगनंतर LIC कंपनीचे बाजार भांडवल 6 लाख कोटी रुपयांवरून घसरुन 3.77 लाख कोटीवर आले आहे. LIC कंपनीचा IPO हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO होता.

एलआयसी शेअरची सध्याची किंमत

भारत सरकारने या IPO द्वारे 21,000 कोटी रुपये भांडवल उभारणीचे लक्ष निश्चित केले होते. IPO साठी सरकारने कंपनीचे 3.5 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात 949 रुपये किमतीवर विकले होते. बाजार भांडवलाच्या दृष्टीने LIC कंपनीच्या मालमत्तेत प्रचंड घट होऊनही तज्ञ स्टॉक बाबत सकारात्मक आहेत. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी LIC कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 598.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एलआयसी शेअर संदर्भात तज्ञांचा सल्ला

LIC स्टॉकवर शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी बाय रेटिंग दिली आहे. ट्रेडलाइन डेटानुसार 15 पैकी 12 तज्ञांनी LIC स्टॉकवर ‘बाय’ आणि ‘स्ट्रॉन्ग बाय’ अशी रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तीन तज्ञांनी LIC स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग दिली आहे. तज्ञांनी LIC स्टॉकवर सरासरी लक्ष्य किंमत 807 रुपये निश्चित केली आहे, जी सध्याच्या किमतींच्या तुलनेत 36 टक्के अधिक आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या मते LIC स्टॉक स्थिर VNB वाढीच्या मार्गावर ट्रेड करत आहे. तज्ञांनी दीर्घ कालावधीसाठी या स्टॉकवर 1,000 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तर ICICI सिक्युरिटीज फर्मने LIC स्टॉकवर 917 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

एलआयसी शेअरची टार्गेट प्राईस

जेएम फायनान्शियल फर्मने LIC स्टॉकवर 940 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज, आयसीआयसीआय सिक्युरिटीज,जेएम फायनान्शिअल, यांनी LIC स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 55-70 टक्के वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. काही तज्ञांनी LIC कंपनीमध्ये मर्यादित वाढीव संभाव्यतेचा हवाला देत स्टॉकबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात LIC स्टॉक 25.70 टक्के घसरला आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price today on 02 June 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x