7 May 2024 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Paras Defence Share Price | पारस डिफेन्स शेअर अप्पर सर्किटवर आदळतोय, एका मोठ्या करारामुळे शेअर खरेदी वाढली, डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • Paras Defence Share Price
  • CONTROP प्रेसिजन टेक्नॉलॉजी कंपनीसोबत संयुक्त उपक्रम करार
  • उर्वरित 70 टक्के वाटा इस्रायल स्थित कंपनी CONTROP चा
  • कंपनीचे तिमाही निकाल
Paras Defence Share Price

Paras Defence Share Price| पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसात 9 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.37 टक्के वाढीसह 536.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्टॉकमध्ये इतक्या तेजीचे कारण म्हणजे कंपनीशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे.

CONTROP प्रेसिजन टेक्नॉलॉजी कंपनीसोबत संयुक्त उपक्रम करार

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीने भारतात इलेक्ट्रो ऑप्टिक / इन्फ्रा रेड सिस्टीम तयार करण्यासाठी CONTROP प्रेसिजन टेक्नॉलॉजी कंपनीसोबत संयुक्त उपक्रम करार केल्याची घोषणा केली आहे. या उपक्रमात पारस डिफेन्स कंपनीचा वाटा 30 टक्के असेल.

उर्वरित 70 टक्के वाटा इस्रायल स्थित कंपनी CONTROP चा

उर्वरित 70 टक्के वाटा इस्रायल स्थित कंपनी CONTROP चा असेल. या कराराअंतर्गत पारस डिफेन्स कंपनी आपला एक व्यक्ती संचालक म्हणून नियुक्त करेल. तर CONTROP च्या प्रस्तावित कंपनीच्या संचालक मंडळावर तीन संचालक नियुक्त केले जातील. पारस डिफेन्स कंपनीने नुकताच सोसायटी ऑफ अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च म्हणजेच SAMEER संस्थेसोबत MOU केला आहे.

कंपनीचे तिमाही निकाल

पारस डिफेन्स कंपनीच्या स्टॉकने या वर्षी मार्च 2023 मध्ये 445.55 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत पारस डिफेन्स कंपनीने 11.84 कोटी रुपये नफा कमावला होता. FY22 च्या चौथ्या तिमाहीत पारस डिफेन्स कंपनीने 10.35 कोटी रुपये नफा कमवला होता.

या तिमाहीत कंपनीने 65.10 कोटी रुपये ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 61.24 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paras Defence Share Price today on 03 June 2023.

हॅशटॅग्स

Paras Defence Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x