29 April 2024 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा
x

Manaksia Share Price | गुंतवणूकदार मालामाल! 3 वर्षांत 475 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या शेअरवर 150 टक्के डिव्हीडंड जाहीर

Highlights:

  • Manaksia Share Price
  • मॅनाक्सिया शेअरची सध्याची किंमत
  • मॅनाक्सिया कंपनीकडून गुंतवणूकदारांना 150 टक्के डिव्हीडंड जाहीर
  • मॅनाक्सिया मल्टीबॅगर स्टॉक
Manaksia Share Price

Manaksia Share Price| मॅनाक्सिया या स्मॉल कॅप कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पोस्ट कोविड रिबाउंडमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. या काळात हा स्टॉक 30.50 रुपयेवरून वाढून 176.50 रुपये किमतीवर पोहचला होता. म्हणजेच मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने 475 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

मॅनाक्सिया शेअरची सध्याची किंमत

आता या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदाराना 150 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 1,150 कोटी रुपये आहे. ही स्मॉल कॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 3 रुपये अंतिम लाभांश वाटप करणार आहे. लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आज मंगळवार दिनक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.98 टक्के घसरणीसह 177.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मॅनाक्सिया कंपनीकडून गुंतवणूकदारांना 150 टक्के डिव्हीडंड जाहीर

मॅनाक्सिया कंपनीने सेबीला डिव्हिडंड पेमेंटबद्दल माहिती कळवली आहे. मॅनाक्सिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 3 जून 2023 रोजी पार पडली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रत्येक इक्विटी शेअर्सवर 150 टक्के म्हणजेच 3.00 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची शिफारस केली आहे. या कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअर धारकांच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात येईल. कंपनी रेकॉर्ड तारखेपासून 30 दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे जमा करेल.

मॅनाक्सिया मल्टीबॅगर स्टॉक

मॅनाक्सिया ही एक स्मॉल कॅप मल्टीबॅगर स्टॉक कंपनी आहे. मागील एका महिन्यात या स्मॉल कॅप मल्टीबॅगर स्टॉकची किंमत 136 रुपयेवरून वाढून 176.50 रुपयेवर पोहचली होती. याकाळात स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर 78.65 रुपयेवरून वाढून 176.50 रुपये पोहचले होते. या काळात गुंतवणूकदारांनी 125 टक्के परतावा कमावला आहे.

मागील एका वर्षात मॅनाक्सिया कंपनीच्या शेअरने लोकांना 127 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 178 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 68.35 रुपये होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Manaksia Share Price today on 06 June 2023.

हॅशटॅग्स

Manaksia Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x