6 May 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका
x

SRF Share Price | SRF मल्टिबॅगर शेअर, 2 रुपयाच्या शेअरने एक लाखाच्या गुंतवणुकीवर 12 कोटी रुपये परतावा दिला

Highlights:

  • SRF Share Price
  • SRF शेअरचा मल्टिबॅगर परतावा
  • SRF शेअरची कामगिरी
  • शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी
SRF Share Price

SRF Share Price | शेअर बाजारात स्टॉक बाबत अंदाज लावणे थोडे कठीण आहे. मात्र असे काही स्टॉक आहेत, जे अल्पावधीतच लोकांना करोडपती बनवू शकतात. असाच एक स्टॉक आहे, ‘एसआरएफ लिमिटेड’. या कंपनीच्या शेअरने नुकताच 2500 रुपये किंमत पार केली आहे. एकेकाळी 2 रुपये किमतीवर ट्रेड करणारा स्टॉक आता 2500 रुपयांच्या पार गेला आहे.

SRF शेअरचा मल्टिबॅगर परतावा

ज्या गुंतवणूकदारांनी एसआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर खरेदी केले होते, ते लोक आता करोडपती झाले असतील, हे नक्की. केमिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 2,522.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

SRF शेअरची कामगिरी

1999 मध्ये एसआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांना 24 वर्षांपूर्वी 50 हजार शेअर्स मिळाले असतील. मात्र आता हा शेअर 2500 रुपयेच्या पार गेला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना एक लाखावर 12 कोटी पेक्षा परतावा मिळाला आहे. असे खूप कमी शेअर्स असतात हे आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीत करोडोचा परतावा कमावून देतात.

शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी

एसआरएफ लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,864.35 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2,002.50 रुपये होती. 14 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. एसआरएफ लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 75,500 कोटी रुपये आहे. आता शेअर बाजारातील तज्ज्ञ देखील या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करत आहेत. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 566.31 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SRF Share Price today on 06 June 2023.

हॅशटॅग्स

#SRF Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x