14 May 2024 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Infollion Research Services Share Price | लॉटरीच लागली! लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस IPO ने 154% परतावा दिला

Highlights:

  • Infollion Research Services Share Price
  • पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 154.87 टक्के लिस्टिंग प्रॉफिट
  • गुंतवणुकीवर परतावा
  • IPO तपशील
Infollion Research Services Share Price

Infollion Research Services Share Price | इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे IPO शेअर्स अप्रतिम किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणुक करणाऱ्या लोकांचे पैसे लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दुप्पट झाले आहेत. इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे IPO शेअर्स 209 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाले आहे.

पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 154.87 टक्के लिस्टिंग प्रॉफिट

इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 80 रुपये ते 82 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 154.87 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 188.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणुकीवर परतावा

इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 209 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले होते. त्यानंतर शेअरची किंमत इंट्रा डे ट्रेडमध्ये 218 रुपये किमतीवर पोहचले होते. त्यानंतर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाल्याने स्टॉक 10 टक्क्यांनी खाली आला होता.

इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ स्टॉक नफा बुकिंगमुळे 198.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या घसरणीनंतर देखील इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करणारे लोक प्रति शेअर 116.55 रुपये नफ्यात आहेत.

IPO तपशील

न्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा IPO 29 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणुकदार 31 मे 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकत होते. इन्फोलिअन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा IPO अवघ्या तीन दिवसात 304 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Infollion Research Services Share Price today on 09 June 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x