19 May 2024 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर तुफान तेजीत, गुंतवणुकदार करत आहेत प्रचंड कमाई, स्टॉक वाढीचे कारण काय?

Highlights:

  • Reliance Power Share Price
  • रिलायन्स पॉवर शेअरमध्ये सातत्याने वाढ
  • रिलायन्स पॉवर स्टॉकची 52 आठवड्यांची पातळी
  • रिलायन्स पॉवर स्टॉकमधील तेजीचे कारण
Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | शेअर बाजारातील चढ उताराच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 16.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर दिवसा अखेर शेअरची किंमत 5.22 टक्के वाढीसह 16.73 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर शेअर 3.88 टक्के घसरणीसह 16.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (Reliance Power Share Price Today)

रिलायन्स पॉवर शेअरमध्ये सातत्याने वाढ

रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत वाढत होते. मागील तीन महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 56 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका महिन्याच्या कालावधीत रिलायन्स पॉवर शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 38.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे.

रिलायन्स पॉवर स्टॉकची 52 आठवड्यांची पातळी

रिलायन्स पॉवर स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी कायम 9.05 रुपये होती. तर 6 सप्टेंबर 2022 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 24.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत होता. फेब्रुवारी 2008 मध्ये हा रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर 240 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

रिलायन्स पॉवर स्टॉकमधील तेजीचे कारण

मात्र नंतर हा स्टॉक तब्बल 93 टक्के खाली घसरला. सध्या या स्टॉकमधील तेजीचे कारण म्हणजे, उन्हाळ्यात वीजेच्या मागणीत जबरदस्त वाढ झाल्याने रिलायन्स पॉवर स्टॉक तेजीत आला आहे. कडक उन्हामुळे देशात विजेचा वापर वाढला, आणि वीज क्षेत्रातील कंपनीच्या शेअरला चालना मिळाली.

विजेच्या वाढत्या मागणीमुळेच रिलायन्स पॉवर कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीने 322 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2022 च्या तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीला 658 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीने 1856 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत 1878 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price today on 17 June 2023.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x