25 May 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | शेअर प्राईस 52 रुपये! झटपट मिळेल 23 टक्केपर्यंत परतावा, कमाईची संधी सोडू नका Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 25 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु
x

IKIO Lighting Share Price | IKIO लायटिंग शेअरची सुपर लिस्टिंग, गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी 38% परतावा मिळाला, आता खरेदी करणार?

Highlights:

  • IKIO Lighting Share Price
  • शेअरची लिस्टिंग 38.60 टक्के वाढीसह झाली
  • IPO तपशील
  • IPO बद्दल थोडक्यात
IKIO Lighting Share Price

IKIO Lighting Share Price | IKIO लायटिंग कंपनीच्या IPO स्टॉकने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री केली आहे. IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स 392.50 रुपये किंमतीवर सूचीबद्ध झाले होते. यामुळे गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 106 रुपये नफा मिळाला. (IKIO Lighting Share Price Today)

शेअरची लिस्टिंग 38.60 टक्के वाढीसह झाली

इंट्रा-डे मधे हा स्टॉक 427.50 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. हा IPO स्टॉक प्री-लिस्टिंग दरम्यान 395 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आयपीओच्या प्राइस बँडपेक्षा शेअरची लिस्टिंग 38.60 टक्के वाढीसह झाली होती. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 41.93 टक्के वाढीसह 404.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

IPO तपशील

IKIO लायटिंग कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 270 रुपये ते 285 रुपये निश्चित करण्यात आली होती. IKIO लाइटिंग IPO 6 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 8 जून 2023 रोजी संपली. या कंपनीच्या IPO बाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला होता. हा IPO स्टॉक 75 पट अधिक सबस्क्राइब झाला होता . IPO च्या तिसऱ्या दिवशी स्टॉक सर्वाधिक म्हणजे 67.75 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

IPO बद्दल थोडक्यात

IKIO लायटिंग कंपनीच्या IPO चा एकूण आकार 350 कोटी रुपये होता. या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या IPO मध्ये लॉट साइज 52 शेअर्स निश्चित करण्यात आली होती. यामुळे गुंतवणूकदाराला एक लॉट खरेदी करण्यासाठी 14,820 रुपये जमा करावे लागले होते.

त्याच वेळी IKIO Lighting कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 181.95 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे. आयपीओपूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांनी 100 टक्के भाग भांडवल धारण केले होते, ते IPO नंतर त्यांचा वाटा 72.46 टक्केवर आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IKIO Lighting Share Price today on 17 June 2023.

हॅशटॅग्स

IKIO Lighting Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x