15 May 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरने पुन्हा अप्पर सर्किट तोडला, स्टॉकमधील तेजीने गुंतवणुकदार अल्पावधीत मालामाल

Highlights:

  • Brightcom Group Share Price
  • गुंतवणूकीवर परतावा :
  • 1 महिन्यात 1 लाख रुपयांवर 3.26 लाख परतावा
  • कंपनीबद्दल थोडक्यात
Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | मागील काही दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 30.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Brightcom Group Share Price NSE)

मागील 9 दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. त्याच वेळी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती. (Brightcom Group Share Price BSE)

गुंतवणूकीवर परतावा :

दोन महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 3 लाख रुपये झाले आहे. मागील एका वर्षात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 32.92 टक्के कमजोर झाले आहेत. 16 जून 2022 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 47.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 9.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र 27 एप्रिल 2023 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 227 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

1 महिन्यात 1 लाख रुपयांवर 3.26 लाख परतावा

जर तुम्ही 27 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.26 लाख रुपये झाले असते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 83.79 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 16 मे 2023 रोजी 15.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 30.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 21.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 3.09 टक्के वाढले आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात

ब्राइटकॉम ग्रुप ही एक डिजिटल मार्केटिंग कंपनी असून तिचे मुख्यालय हैदराबाद शहरात आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे कार्यालय आणि व्यवसाय अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, मेक्सिको, यूके, फ्रान्स, या देशात विस्तारले आहेत. या कंपनीमध्ये दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी देखील मोठी गुंतवणुक केली आहे. त्यांनी 2.5 कोटी शेअर्स म्हणजेच कंपनीचे एकूण1.24 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार शंकर शर्मा यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 75.7 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price today on 17 June 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x