16 May 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये
x

Viral Video | हा शिंदे गट नसून ही एक चोरांची टोळी आहे! कधी कोणाचा बाप पळव तर कधी कोणाची मुलं पळव - मनीषा कायंदे

Viral Video

Viral Video | शिवसेनेच्या स्थापनेला आज 57 वर्षे झाली असून वर्धापन दिनानिमित्त दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ठाकरे गटाच्या पक्षाचा आणि दुसरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचा असे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपारिक वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.

दरम्यान, मनिषा कायंदे यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला आहे..शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही कौतुक केलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचं शिबिर मुंबईमध्ये घेतलं होतं, या शिबिराआधीच मनिषा कायंदे यांनी प्रवेश केला असला तरी त्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला कोणताही फरक पडणार असंच दिसतंय.

कारण मनीषा कायंदे या ठाकरेंच्या कृपेने विधान परिषद आमदार झाल्या होत्या. विधानसभेत निवडून येण्याची ताकद नसल्याने त्या शिंदेंच्या गळाला लागल्याचं म्हटलं जातंय. तसेच शिवसेना फ़ुटूनंतर इतर महिला नेत्या जशा पक्ष वाढ आणि पक्ष विस्तारासाठी दौरे आणि मेहनत घेत होत्या तशा मनीषा कायंदे मेहनत घेताना दिसल्या नव्हत्या. घरी बसून व्हिडिओतुन व्यक्त होणे हाच त्यांचा पक्ष विस्तार कार्यक्रम झाला होता. आता त्यांचा तसाच एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतं असून त्यावर शिंदे गटाची खिल्ली उडवली जातेय.

News Title :  Viral Video MLA Manisha Kayande on Shinde camp check details on 19 June 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x