16 May 2024 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

शिंदेंनी शिवसेनेत बंड करताना अजित पवार यांना जवाबदार धरलं होतं, तेव्हा एकनाथ शिंदें धादांत खोटं बोलत होते हे आज सिद्ध झालं

CM Eknath Shinde

DCM Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षावर आपला अधिकार असल्याचा दावा केला आहे. शरद पवार हे प्रदीर्घ काळ राष्ट्रवादीचे नेतृत्व करत आहेत. मात्र, आता राजकीय हालचाली वेगात आहेत. अजित पवार पक्षाच्या इतर 9 नेत्यांसह आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हे मंत्रीपद ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेअर करणार आहेत. तसेच आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सत्तेत आलो आहोत असं देखील अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. मात्र आता अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याने शिंदे गट अडचणीत सापडला आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना सोडताना म्हणाले अजित पवार यांच्यामुळे अन्याय झाला आणि ते आमदार निधी वाटपात राजकारण करून शिवसेना संपवण्याचे काम करत होते आणि त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो असा आरोप केला होता. मात्र आता तेच पुन्हा तेच उपमुख्यमंत्री पद आणि अर्थखाते घेऊन अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे सत्तेला लाथ मारून बाहेर पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शिंदेंच्या जुन्या दाव्यांच्या मिम्सचा समाज माध्यमांवर अक्षरशः धुमाकूळ सुरु झाला आहे.

राष्ट्रवादीवर नाराजी
एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीवर नाराज होते असं ते वारंवार बंड केल्यानंतर सांगत होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने शिवसेनेवर दबाव आणला जात होता. शिवाय राज्यात शिवसेनेची सत्ता असण्यापेक्षा राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याचं चित्रं निर्माण होतंय असं एकनाथ शिंदे वारंवार म्हणाले होते. युतीच्या काळात मुख्यमंत्री भाजपचा असला तरी सत्तेचं केंद्र मातोश्री असायचं. आता मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही सत्तेचं केंद्र सिल्व्हर ओक झालं आहे असं शिंदे म्हणाले होते.

निधी वाटपात अन्याय
राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद आहे. तसेच अर्थ खातंही आहे. त्यामुळे आमदारांना किती निधी द्यायचा हे राष्ट्रवादीच्या हाती आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून सातत्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला. राष्ट्रवादीच्या आमदारांना मात्र भरघोस निधी मिळत होता. राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराने त्या अडीच वर्षात निधी मिळण्यावरून कधीच तक्रार केली नाही. उलट काँग्रेसने निधी बाबत सर्वात आधी तक्रार केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनीही या तक्रारी केल्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं असं आरोप शिंदे यांनी केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद होती असं शिंदे म्हणाले होते. मात्र आता अजित पवार तीच खाती घेऊन शिंदेंसोबत बसणार आहेत. आजच्या घडामोडींमुळे शिंदेचा राजकीय बुरखा फाटला असं देखील म्हटलं आहे.

News Title : CM Eknath Shinde allegations during rebel exposed today 02 July 2023.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x