16 May 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार
x

Federal Bank Share Price | झुनझुनवाला कुटुंबीयांचा खास फेडरल बँक शेअर तेजीत आला, खरेदीची योग्य वेळ आली?

Federal Bank Share Price

Federal Bank Share Price | फेडरल बँक स्टॉकमध्ये मागील काही दिवसांपासून अपट्रेण्ड पाहायला मिळत आहे. सोमवारी फेडरल बँक स्टॉक 1.15 टक्के वाढीसह 127.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून तिमाही दरम्यान एकूण ठेवी आणि कर्जदात्यांकडील ढोबळ कर्जामध्ये 21 टक्क्यांची वृध्दी झाली आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी फेडरल बँक स्टॉक 1.06 टक्के वाढीसह 133.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

फेडरल बँकेने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, बँकेकडील एकूण ठेवी 30 जून 2022 रोजी पर्यंत 2,22,513 कोटी रुपये होत्या, ज्यात 21.40 टक्क्यांची वाढ झाली आणि एकूण ठेवी 1,83,355 कोटी रुपयेवर पोहोचले आहेत. 30 जून 2022 पर्यंत बँकेकडील एकूण अ‍ॅडव्हान्स 20.90 टक्क्यांच्या वाढीसह 1,86,593 कोटीवर पोहचले आहेत.

अंतर्गत वर्गीकरणानुसार, किरकोळ क्रेडिट बुक 20.20 टक्‍क्‍यांनी वाढली आहे, तर घाऊक क्रेडिट बुकमध्ये देखील 21.60 टक्‍क्‍यांची वाढ पाहायला मिळाली आहे. फेडरल बँकेच्या ठेवी आणि ठेवींची प्रमाणपत्रे 30 जून 2022 रोजी 1,79,586 कोटी रुपयांच्या तुलनेत 17.20 टक्क्यांच्या वाढीसह 2,10,439 कोटी रुपयेवर पोहचले आहेत.

जून 2023 तिमाहीत बँकेचे CASA प्रमाण, चालू खाती आणि बचत खात्यांमधील एकूण ठेवींमध्ये अनुक्रमे 36.84 टक्के आणि 32.68 टक्के, 31.85 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्मने आज फेडरल बँक स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. काल हा बँकिंग स्टॉक 1.86 टक्क्यांच्या वाढीसह 128.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीचे अपडेट जाहीर केल्यानंतर, ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर यांनी फेडरल बँक स्टॉकवर ‘बाय’ देऊन 170 रुपये लक्ष किमतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किंमत पातळीच्या तुलनेत लक्ष किंमत 32.35 टक्क्यांनी अधिक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Federal Bank Share Price today on 05 July 2023.

हॅशटॅग्स

#Federal Bank Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x