14 May 2024 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव जोरदार खाली घसरले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. मागील काही दिवसांत ६८,००० रुपयांपर्यंत घसरलेली चांदी पुन्हा एकदा 70000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. सोनंही 58000 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोन्यात आज मंदी दिसून येत आहे. मात्र, चांदीत काही प्रमाणात तेजी कायम आहे. मे महिन्यात सोने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती. (Gold Price Today)

सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण

सराफा बाजारात सोन्यात घसरण झाली असली तरी चांदीत मात्र वाढ झाली आहे. सोनं 60,000 रुपयांच्या खाली आहे. तर चांदीने ७० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, दिवाळीच्या हंगामात सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होऊ शकते, असा दावा काही तज्ज्ञांकडून केला जात आहे. दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ दिसून येत आहे.

सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण

सराफा बाजाराचे दर https://ibjarates.com या अधिकृत संकेतस्थळावरून दररोज जाहीर केले जातात. आज म्हणजे गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि चांदीच्या दरात वाढ झाली. मुंबई पुणेसह देशातील प्रमुख सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 75 रुपयांनी घसरून 58557 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदी 1100 रुपयांनी वाढून 70800 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. याआधी बुधवारी सोने 58631 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 69699 रुपयांवर बंद झाली होती.

एमसीएक्सवर सोने-चांदीच्या दरात वाढ

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. एमसीएक्सवर गुरुवारी सोने २८ रुपयांनी वधारून ५८५०१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १०९ रुपयांच्या वाढीसह ७१४६६ रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे. याआधी बुधवारी एमसीएक्सवर सोने 58473 रुपये आणि चांदी 71357 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर :

* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५४२५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९१६० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५४२८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९१९० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५४२५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९१६० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५४२८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९१९० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54250 रुपये, 24 कॅरेट सोने : 59160 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५४२५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९१६० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५४२८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९१९० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५४२५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९१६० रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५४२५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९१६० रुपये
* ठाणे – २२ कॅरेट सोने : ५४२५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९१६० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५४२८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९१९० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 06 July 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(213)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x