18 May 2024 10:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सची तेजी थांबली? पण दिग्गज बिग-बुल शेअर्स खरेदी करत आहेत, स्वस्तात खरेदी करावा?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम कामगिरीने चकित केले आहे. मागील काही महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 18 रुपयेवर पोहचले आहे. दुसऱ्याबाजूला शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जीचे तब्बल १३ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. (Suzlon Energy Share Price)

मागील एका वर्षात शेअर्सने 212.83 टक्के परतावा दिला

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 212.83 टक्के नफा कमावून दिला आहे. आता शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी देखील सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहे. मुकुल अग्रवाल यांनी सुझलॉन कंपनीचे 13 कोटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.94 टक्के घसरणीवरसह 17.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जून 2023 च्या तिमाहीच्या डेटानुसार मुकुल अग्रवाल यांच्याकडे सुझलॉन एनर्जी कंपनीचे 1.04 टक्के भाग भांडवल आहेत. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीच्या वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या यादीत मुकुल अग्रवाल यांचे नाव नमूद केले नव्हते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 20.80 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5.43 रुपये होती. 3 एप्रिल 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 26 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 18.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 3 वर्षात शेअर्सने 793 टक्के परतावा दिला

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील तीन वर्षांत तब्बल 793 टक्के वाढले आहे. जर तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 8.93 लाख रुपये झाले असते. मागील तीन दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये लोअर सर्किट लागत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 18.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जून 2023 च्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या नफ्यात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. तर कंपनीचा नफा 96 टक्के घसरणीसह 101 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत या कंपनीने 2392 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Suzlon Share Price today on 27 July 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x