12 May 2024 8:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Free Bonus Shares | कमाईचा डबल धमाका! GNA एक्सल्स शेअर्सवर डिव्हीडंड प्लस फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड तारीख पाहून हात धुवून घ्या

Free Bonus Shares

Free Bonus Shares | जीएनए एक्सल्स लिमिटेड या स्मॉल कॅप ऑटो ऍन्सिलरी कंपनीचे शेअर्स सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 989.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, या बैठकीत कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याची घोषणा केली आहे. (GNA Axles Share Price)

ही कंपनी आपल्या शेअरधारकांना प्रति शेअर 6 रुपये लाभांश वाटप करणार आहे. यासह कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.57 टक्के वाढीसह 993.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 02 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. 21 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संचालक मंडळाने 11 ऑगस्ट 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. मात्र नंतर कंपनीने त्यात सुधारणा करून रेकॉर्ड तारीख 2 सप्टेंबर 2023 निश्चित केली आहे.

गुंतवणुकीवर परतावा :

मागील पाच दिवसांत जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 25.94 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40.13 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 40.13 टक्के वाढली आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 136.19 टक्के नफा कमावून दिला आहे. जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,008.60 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 533.60 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Free Bonus Shares today on 27 July 2023.

हॅशटॅग्स

Free Bonus Shares(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x