10 May 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Yudiz Solutions IPO | अजून एक IPO आला! कमाईची संधी, युडीझ सोल्युशन्स IPO गुंतवणुकीसाठी आज खुला झाला, शेअर प्राईस बँड खूप स्वस्त

Yudiz Solutions IPO

Yudiz Solutions IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी पासून युडीझ सोल्युशन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 162-165 रुपये निश्चित केली आहे.

4 ऑगस्ट 2023 पासून तुम्ही या कंपनीच्या IPO साठी बोली लावू शकता. युडीझ सोल्युशन्स ही एक SME कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स मुख्यतः नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहे. ग्रे मार्केटमध्ये युडीझ सोल्युशन्स कंपनीचे IPO शेअर्स 30 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

IPO तपशील :

युडीझ सोल्युशन्स ही कंपनी आपल्या IPO द्वारे शेअर बाजारातून 44.84 कोटी रुपये भांडवल उभारणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 27,17,600 नवीन इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकण्यासाठी IPO लाँच केला आहे. युडीझ सोल्युशन्स कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 800 इक्विटी शेअर्स ठेवले आहेत. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 1,32,000 रुपये जमा करावे लागणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एका लॉटसाठी आणि HNI गुंतवणूकदार किमान दोन लॉटसाठी बोली लावू शकतात.

युडीझ सोल्युशन्स ही कंपनी 2012 साली स्थापन झाली होती. युडीझ सोल्युशन्स ही कंपनी ब्लॉकचेन, एआय आणि गेमिंग केंद्रित एंटरप्राइझ सोल्यूशन्स तंत्रज्ञान सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना आयटी सोल्यूशन्स आणि सल्ला प्रदान करण्याचे काम देखील करते. युडीझ सोल्युशन्स ही कंपनी मोबाइल, वेब, AR / VR UI / UX आणि IOT मध्ये ट्रेडिंग तंत्रज्ञान एकत्रित करून विविध उपाय प्रदान करण्याचे काम करते.

कंपनीच्या सेवां श्रेणीमध्ये मोबाइल अॅप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, ब्लॉकचेन, एआर / व्हीआर, वेब डेव्हलपमेंट, वेबसाइट डिझाइन, डेव्हलपमेंट, वेबसाइट मेंटेनन्स, सपोर्ट, ई-कॉमर्स वेब अॅप, पोर्टल डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप प्रोटोटाइपिंग, अँड्रॉइड/आयओएस अॅप डेव्हलपमेंट, पीसी यासंबंधीची सर्व सेवा सामील आहे.

युडीझ सोल्यूशन्स ही कंपनी आपल्या ग्राहकांना ब्लॉकचेन, एआय आणि गेमिंग संबंधित एकत्रित सेवा प्रदान करते. असा क्षेत्रात काम करणारी आणि शेअर बाजारात सूचीबद्ध केलेली ही पहिली कंपनी असणार आहे. अहमदाबाद शहरात मुख्य उपस्थिती असलेली युडीझ सोल्युशन्स कंपनीकडे उत्तर अमेरिका, युरोप, आशियामध्ये आणि इतर देशांतही वेब डेव्हलपमेंट क्लायंट आहेत. Akasa Air, MPL, Zydus, RR Kabel, IRM Energy, Sportsbuzz हे युडीझ सोल्युशन्स कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत सामील आहेत.

नारनोलिया फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मला युडीझ सोल्युशन्स IPO इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर पीएलएस कॅपिटल आणि लॉन्गव्ह्यू रिसर्च अँड अॅडव्हायझरी यांना युडीझ सोल्युशन्स IPO इश्यूचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मास सर्व्हिसेस फर्मला या IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपनीचे शेअर्स 17 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yudiz Solutions IPO opened for investment on 04 August 2023.

हॅशटॅग्स

Yudiz Solutions IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x