20 May 2024 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स लवकरच 'पॉवर' दाखवणार, मोठा फायदा होईल, सविस्तर कामगिरी आणि म्हत्वाची अपडेट समोर आली

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड ही भारतातील एक अग्रणी अक्षय ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. नुकताच या कंपनीने आनंद ग्रुपसोबत 4.4 मेगावॅट क्षमतेचा ग्रुप कॅप्टिव्ह पॉवर वितरण करार संपन्न केला असल्याची माहिती जाहीर केली आहे.

आनंद ग्रुप ही ग्लोबल ऑटोमोटिव्ह सिस्टम आणि पार्ट्स बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. या कराराअंतर्गत टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनी 10 दशलक्ष युनिट्स स्वच्छ आणि हरित ऊर्जेची निर्मिती करून वितरीत करणार आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के नफा मिळवून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.18 टक्के घसरणीसह 246.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची कामगिरी

11 मे 2020 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता 247 रुपयेपर्यंत वाढले आहेत. म्हणजेच मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के नफा कमावून दिला आहे. टाटा पॉवर कंपनी नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोतापासून वीज निर्मिती करून आनंद गृप वितरीत करणार आहे. यामुळे वार्षिक 5500 टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनी मिशन स्वच्छता आणि हरित भविष्य यासारख्या कारणासाठी मेहनत घेत आहे. टाटा पॉवर कंपनी आनंद ग्रुपसारख्या कंपन्यांना अक्षय ऊर्जा स्रोतांपासून वीज उपलब्ध करून देऊन पर्यावरणपूरक ऊर्जा उपाय विकसित करून शाश्वत, स्वच्छ आणि हरित पर्यावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

परतावा आणि तिमाहीत निकाल

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 247 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 300 टक्के मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. जून तिमाहीत कंपनीची विक्री दोन टक्क्यांच्या वाढीसह 15003 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा EBITDA 43 टक्के वाढीसह 3005 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा 69 टक्क्यांच्या वाढीसह 1141 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

30 जून 2023 पर्यंत टाटा पॉवर कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 17643 कोटी रुपये होता. टाटा पॉवर कंपनीने जून तिमाहीत 4199 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता साध्य केली आहे. टाटा पॉवर कंपनीच्या रुफटॉप सोलर आणि ग्रुप कॅप्टिव्ह ऑर्डर बुकचा आकार 2504 कोटी रुपये पर्यंत वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 31 August 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x