18 May 2024 11:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Rahu Rashi Parivartan | क्या बात! 'या' 4 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? मायावी 'राहु'ची शुभं कृपा बरसणार, हे चमत्कार घडतील

Rahu Rashi Parivartan 2023

Rahu Rashi Parivartan 2023 | ज्योतिषशास्त्रात राहू हा मायावी ग्रह मानला जातो. राहु राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. राहू 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत मेष राशीत राहील आणि त्यानंतर मीन राशीत प्रवेश करेल. राहू राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या जीवनात अडचणी येऊ शकतात, पण काही राशींवर त्यांची प्रचंड कृपा होऊन करिअरसोबतच आर्थिक प्रगतीही होऊ शकते. जाणून घ्या या ४ नशिबवान राशींविषयी ज्यांच्यावर राहु राशी परिवर्तनामुळे प्रचंड शुभं कृपा बरसणार आहे…

मेष राशी –

मेष राशीच्या लोकांसाठी राहू चे संक्रमण एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे धनलाभ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वर्षाच्या अखेरीस तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरदार व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती मिळू शकते आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

कर्क राशी –

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी राहू संक्रमणामुळे दीर्घकाळचे अडथळे दूर होऊ शकतात. या काळात नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न अखेर पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांना फायदा होईल.

सिंह राशी –

सिंह राशीच्या लोकांना या राहू संक्रमणातून अनुकूल परिणाम मिळू शकतात. या काळात तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. तथापि, संक्रमण कालावधीच्या सुरुवातीला आपला खर्च वाढू शकतो. पण कालांतराने तुम्ही नियंत्रण मिळवाल. राहू संक्रमणातून अधिक शुभ होण्यासाठी भगवान शिवाचा जलाभिषेक करण्याचा सल्ला दिला जातो.

मीन राशी –

ऑक्टोबर २०२३ मध्ये राहूचे मीन राशीतील गोचर मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही करिअरमध्ये जबरदस्त प्रगती कराल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. या संक्रमणा दरम्यान रखडलेले पैसे वसूल केले जाऊ शकतात.

News Title : Rahu Rashi Parivartan 2023 effect on these 4 zodiac signs check details on 01 Sept 2023.

हॅशटॅग्स

#Rahu Rashi Parivartan 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x