12 May 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअलने ब्लॅकरॉक सोबत करार केला, शेअरमध्ये जबरदस्त तेजी, गुंतवणूक करून फायदा घ्यावा?

Jio Financial Share Price

Jio Financial Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच बीएसईने जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर अप्पर सर्किट फिल्टर 5 टक्क्यांवरून वाढवून 20 टक्केवर नेले आहे. हे नवीन अप्पर सर्किट प्रमाण 4 सप्टेंबर 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहे. (JFSL Share Price)

याचा अर्थ असा की, जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स आता 20 टक्के वाढीसह किंवा घसरणीसह ट्रेड करतील. ही सेबीद्वारे निश्चित करून देण्यात आलेली उच्चांक आणि नीचांक मर्यादा असते. सर्किट फिल्टर्स लावल्यास शेअर्समध्ये होणारी अत्यधिक घसरण किंवा वाढ नियंत्रणात ठेवता येते, जेणेकरून गुंतवणूकदारांना अधिक फायदा किंवा नुकसान सहन करावा लागणार नाही. आज सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स 2.59 टक्के वाढीसह 251.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इतर कंपन्या ज्याच्ये सर्किट बदलले

नुकताच बीएसईने जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअरचे सर्किट फिल्टर्स बदलले आहेत, त्याचप्रमाणे श्री वेंकटेश रिफायनरीज, रेलटेल, इंडिया पेस्टिसाइड्स आणि सुपर फाइन निटर्स कंपनीच्या सर्किटमध्ये देखील वाढ करून 10 टक्के करण्यात आले आहेत. ऋषभ दिघा स्टील, व्हर्टेक्स सिक्युरिटीज, रतन इंडिया पॉवर कंपनीचे सर्किट बदलून कंपनीने 5 टक्के केले आहे.

शेअरची कामगिरी

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 245.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.55 लाख कोटी रुपये आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्समधून वगळण्यात येणार होते. मात्र, विक्रीच्या दबावामुळे आणि लोअर सर्किटमुळे स्टॉक बीएसई इंडेक्समधून वगळला नाही. जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स सध्या सेन्सेक्स आणि निफ्टी 50, आणि BSE आणि NSE अशा प्रमुख निर्देशांकांवर ट्रेड करत आहेत.

विमा क्षेत्रात व्यवसाय विस्तार

28 ऑगस्ट 2023 रोजी, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपल्या कंपनीच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केली होते की, जिओ फायनान्शियल कंपनी पुढील काळात जीवन विमा, सामान्य विमा, आणि आरोग्य विमा या क्षेत्रात देखील आपली सेवा प्रदान करणार आहे. यासह जिओ फायनान्शिअल कंपनीने मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात प्रवेश करण्यासाठी देखील अमेरिकेतील दिग्गज कंपनी ब्लॅकरॉक सोबत करार केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Share Price today on 04 September 2023.

हॅशटॅग्स

Jio Financial Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x