14 May 2024 9:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Tata Coffee Share Price | टाटा कॉफी शेअर्समध्ये उलाढाल वाढली, कारण काय? स्टॉक रिटर्न तपासून घ्या

Tata Coffee Share Price

Tata Coffee Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कॉफी कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारी टाटा कॉफी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 258.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 251.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टाटा कॉफी कंपनीचे बाजार भांडवल 4,695.41 कोटी रुपये आहे.

टाटा कॉफी कंपनीच्या मागील दोन वर्षांच्या परताव्याचा आढावा घेतला तर आपल्याला समजेल की, टाटा कॉफी कंपनीचे शेअर्स कमजोर झाले आहेत. आज सोमवार दिनांक टाटा कॉफी कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 250.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यांत टाटा कॉफी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टाटा कॉफी कंपनीचे शेअर्स 16 टक्के वाढले आहेत. नुकताच टाटा कॉफी कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. जून 2023 तिमाहीत टाटा कॉफी कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या जून तिमाहीचे तुलनेत 5 टक्क्यांनी कमी झाला आहे. जून तिमाहीत कंपनीने 62.06 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 5 टक्के कमी झाला आहे. मागील वर्षी टाटा कॉफी कंपनीने 65.49 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

टाटा कॉफी कंपनीने मागील वर्षीच्या जून तिमाहीत 666.05 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर जून 2023 तिमाहीत कंपनीने 707.93 कोटी रुपये महसूल संककित केला आहे. कंपनीच्या महसुलात वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीच्या भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांतील कॉफी आणि इन्स्टंट कॉफी व्यवसायात वाढ नोंदवली गेली आहे.

टाटा कॉफी लिमिटेड ही कंपनी टाटा समूहाच्या दिग्गज टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. पूर्वी ही कंपनी टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. टाटा कॉफी ही आशिया खंडातील सर्वात मोठी कॉफी कंपनी असून इन्स्टंट कॉफीची दुसरी सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे. टाटा कॉफी कंपनीचे दक्षिण भारतात कॉफीचे मळे आहेत, ज्यातून जी कंपनी 8,000-10,000 टन अरेबिका आणि रोबस्टा कॉफीचे उत्पादन घेते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Coffee Share Price today on 04 September 2023.

हॅशटॅग्स

#Tata Coffee Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x