13 May 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
x

Adani Total Gas Share Price | प्रभू की लीला! अदानी टोटल गॅस कंपनीला गुजरातमध्ये मोठी सरकारी ऑर्डर, शेअर्स तेजीत येणार? डिटेल्स नोट करा

Adani Total Gas Share Price

Adani Total Gas Share Price | गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीला अहमदाबाद महानगर पालिकेकडून एक मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. ही बातमी येताच अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 649.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के वाढीसह 648.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑर्डर तपशील

अदानी टोटल गॅस कंपनीला भाजप शासित गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात बायो सीएनजी प्लांट तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत अदानी टोटल गॅस कंपनीला 500 टीपीडी क्षमतेचा बायो सीएनजी प्लांट बांधायची जबाबदारी देण्यात आली आहे.

अदानी टोटल गॅस कंपनीला ही ऑर्डर अहमदाबाद महानगर पालिकेने दिली आहे. पुढील 20 वर्षासाठी अदानी टोटल गॅस कंपनी या गॅस प्लांटची रचना, वित्तपुरवठा आणि संचालनाचे काम देखील हाताळणार आहे. अदानी टोटल गॅस कंपनीचा हा प्रोजेक्ट अहमदाबाद शहरात पिराना किंवा गयासपूरमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत बनवला जात आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात

अदानी टोटल गॅस लिमिटेड ही कंपनी भारतातील CNG आणि PNG च्या पुरवठ्यात देशात अग्रणी कंपनी मानली जाते. ही कंपनी घरगुती, औद्योगिक, तसेच व्यावसायिक ग्राहकांना पीएनजी गॅसचा पुरवठा करण्याचे काम करते. त्याचबरोबर कंपनी वाहतूक क्षेत्राला देखील सीएनजी गॅसचा पुरवठा करण्याचे काम करते.

जून 2023 तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 7.1 टक्के वाढीसह 147.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 137.84 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3998.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 620.15 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Adani Total Gas Share Price today on 7 September 2023

हॅशटॅग्स

#Adani Total Gas Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x