19 May 2024 3:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

धक्कादायक! संसदेचं विशेष अधिवेशन का बोलावलंय याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा नाही, सर्वकाही मोदी-शहांच्या बैठकीप्रमाणे

Special Session of Parliament

Special Session of Parliament | केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनावर विरोधकांनी आधीच हल्ला चढवला आहे. आता पुन्हा एकदा राजदचे खासदार मनोज सिन्हा यांनी विशेष अधिवेशनासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोनच लोकांची बैठक झाली आहे, कारण या दोन लोकांशिवाय त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही याबद्दल काहीच माहिती नाही.

संसदेच्या विशेष अधिवेशनावर भाष्य करताना राजदचे खासदार मनोज झा म्हणाले की, हे सर्वसाधारण अधिवेशन नसून विशेष अधिवेशन आहे. पूर्वी जेव्हा जेव्हा विशेष अधिवेशन बोलवले जायचे, तेव्हा हे विशेष अधिवेशन का बोलावले आहे, याची लोकांना कल्पना असायची. पण आता या दोन व्यक्तींशिवाय कुणालाच याची माहिती नाही हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.

मनोज झा म्हणाले, ‘नव्या भारताची ही नवी पारदर्शकता आहे. आता हे विशेष अधिवेशन का बोलावण्यात आले आहे हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोनच लोकांना माहित आहे आणि कोणालाच माहित नाही.

कुणाकडेच बातमी नाही : मनोज सिन्हा

संसदेच्या विशेष अधिवेशनावर भाष्य करताना मनोज झा म्हणाले की, संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनाही या अधिवेशनात काय चर्चा होईल, ते का बोलावले जात आहे याची माहिती नाही. राज्यसभेतील सभागृह नेते पियुष गोयल यांनाही या अधिवेशनात उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांची माहिती नाही.

संसदेचे विशेष अधिवेशन कधी सुरू होणार?

संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून जुन्या इमारतीत सुरू होणार असून, १९ सप्टेंबररोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ते नव्या इमारतीत हलविण्यात येणार आहे. हे अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होऊन २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले होते आणि संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, असा विरोधकांनी विरोध केला होता.

News Title : Special Session of Parliament Modi cabinet also not aware about Agenda said Manoj Jha 07 September 2023.

हॅशटॅग्स

#Special Session of Parliament(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x