12 May 2024 9:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Penny Stock | मार्ग श्रीमंतीचा! चॉकलेट दरातील पेनी शेअरने 1 वर्षात दिला 700% परतावा, शेअरची किंमत 13 रुपये, खरेदी करणार?

Penny  Stock

Penny Stock | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता असताना गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 13.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 आठवड्यात गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअरची किंमत 2 टक्के वाढली होती. तर महिला 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12.33 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 702 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 1.93 टक्के वाढीसह 13.74 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सप्टेंबर 2018 पासून आत्तापर्यंत गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1196 टक्के वाढवले आहेत. गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 19.33 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.59 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75 कोटी रुपये आहे.

ही कंपनी सध्या चर्चेत असण्याचे कारण म्हणजे, गुजरात टूल रूम कंपनीने ऑगस्ट 2023 मध्ये हाँगकाँगच्या इम्पीरियल बिझनेस ट्रेडिंग लिमिटेड कंपनीसोबत आयात संबंधित व्यापारी करार केला आहे. हाँगकाँगच्या इम्पीरियल बिझनेस कंपनी सोबतच्या करारामुळे पुढील काळात गुजरात टूलरूम कंपनीचा आणखी वाढणार आहे. या कराराचे मूल्य जवळपास 150 कोटी रुपये आहे.

गुजरात टूलरूम या कंपनीची स्थापना 1992 साली झाली होती. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने स्वित्झर्लंडच्या सोबर एजीच्या तांत्रिक सहकार्याने व्यवसाय कार्याला सुरुवात केली होती. गुजरात टूलरूम कंपनी आपल्या उत्कृष्ट उत्पादनांमुळे आणि नाविन्यपूर्ण गुणवत्तेमुळे गुंतवणूकदारांसाठी नेहमी आकर्षणाचे केंद्र राहिली आहे.

या कंपनीने मागील 30 वर्षांच्या व्यवसाय कारकीर्दीत 300 पेक्षा अधिक उच्च मोल्ड बनवले आहेत. या कंपनी कंपनीची अभियांत्रिकी उत्पादन क्षमता अप्रतिम आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहेत. फायदा मिळविण्यासाठी तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stock of Gujrat Toolroom share price on 07 September 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x