10 May 2024 10:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 115 टक्के परतावा देणाऱ्या शक्ती पंप्स शेअरने 1 दिवसात 12 टक्के परतावा दिला

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शक्ती पंप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे, नुकताच कंपनीला उत्तर प्रदेश सरकारच्या कृषी विभागाने 10,000 पंपांचा पुरवठा करण्यासाठी 293 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ही बातमी जाहीर होताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.41 टक्के वाढीसह 877 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शक्ती पंप्स लिमिटेड कंपनीला उत्तर प्रदेश सरकारच्या कृषी विभागाकडून PM KUSUM III योजने अंतर्गत 10,000 पंपांचा पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी शक्ती पंप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.02 टक्के वाढीसह 866.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शक्ती पंप्स लिमिटेड कंपनीला यूपी सरकारच्या कृषी विभागाने जी ऑर्डर दिली आहे, त्याचे एकूण मुल्य 293 कोटी रुपये आहे. या ऑर्डर अंतर्गत सोलर वॉटर पंपिंग सिस्टीमचा पुरवठा, स्थापना, कार्यचलन करणे अपेक्षित आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्याचा कालावधी 90 दिवस आहे.

शक्ती पंप्स लिमिटेड कंपनी मुख्यतः पंप आणि मोटर्सचे उत्पादन करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी सिंचन, फलोत्पादन, घरगुती पाणीपुरवठा, व्यावसायिक आणि औद्योगिक उपयोग इत्यादींसाठी आधुनिक पाणी पंपिंग संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते.

2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत शक्ती पंप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. जून 2023 तिमाहीत शक्ती पंपां कंपनीची निव्वळ विक्री 113.06 कोटी रुपये नोंदवली गेली होती. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 254.48 कोटी रुपये नोंदवली गेली होती. जून 2023 तिमाहीत शक्ती पंप्स लिमिटेड कंपनीने 1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीतील निव्वळ नफ्याच्या तुलनेत जून 2023 तिमाहीत निव्वळ नफ्यात 88.6 टक्के घट झाली आहे. जून तिमाहीत कंपनीचा EBITDA 22.42 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच EBITDA 8.46 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Shakti pump share price 16 September 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x