10 May 2024 10:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Killpest Share Price | कुबेर आशीर्वाद लाभलेला शेअर, किलपेस्ट शेअरने 1 लाखावर दिला 1 कोटी परतावा, लवकरच 46% परतावा मिळेल

Killpest Share Price

Killpest Share Price | शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात मजबूत परतावा देतातच, मात्र अल्पावधीत देखील भरघोस कमाई करून देतात. किलपेस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स अशीच कामगिरी करत आहेत. 8 वर्षापूर्वी ज्या लोकांनी किलपेस्ट इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता करोडो रुपये झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पट अधिक वाढवले आहेत.

तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात. शेअर बाजारातील तज्ञांनी किलपेस्ट इंडिया स्टॉकमध्ये सध्याच्या किमतीवरून आणखी 46 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी किलपेस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स 3.08 टक्के घसरणीसह 782.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

24 सप्टेंबर 2015 रोजी किलपेस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर हा स्टॉक 10155 टक्क्यांनी वाढून 810.15 रुपये किमतीवर पोहचला होता. ज्या लोकांनी 8 वर्षांपूर्वी किलपेस्ट इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी पेक्षा जास्त वाढले आहेत.

किलपेस्ट इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ दीर्घकालीनच नव्हे तर अल्पकाळात देखील मजबूत नफा कमावून दिला आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 315.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षापेक्षा कमी कालावधीत या कंपनीचे शेअर्स 175 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. 11 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 867 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

ब्रोकरेज फर्म नुवामाने 11 सप्टेंबर 2023 रोजी जारी केलेल्या अहवालात किलपेस्ट कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. नुवामा फर्मच्या मते भारतातील molecular diagnostics मार्केटचा आकार 300-400 कोटी रुपये आहे. या मार्केटमध्ये किलपेस्ट कंपनीने एकूण 10-12.5 टक्के वाटा काबीज केला आहे. याचा अर्थ किलपेस्ट कंपनीच्या व्यापारात आणखी वाढीची शक्यता आहे.

ब्रोकरेज फर्म नुवामाच्या मते किलपेस्ट इंडिया शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. डॉ लाल पॅथलॅब्स आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअर यासारख्या आघाडीच्या डायग्नोस्टिक कंपन्यांच्या तुलनेत किलपेस्ट इंडिया कंपनीच्या शेअरचा पी / ई गुणोत्तर 51 टक्के कमी आहे.

किलपेस्ट इंडिया कंपनीच्या शेअरची संपूर्ण आर्थिक कामगिरी तपासून नुवामा फर्मने स्टॉकवर बाय रेटिंग जाहीर केली आहे. किलपेस्ट कंपनीने आपली उपकंपनी 3B ब्लॅकबायो बायोटेक इंडिया ही कंपनी विलीन करून त्यांचे नाव 3B ब्लॅकबायो डीएक्स ठेवण्याची घोषणा केली आहे. विलीनीकरणानंतर ही कंपनी अॅग्रोकेमिकल कंपनीऐवजी डायग्नोस्टिक कंपनी म्हणून आपली कारकीर्द सुरू करेल.

ब्रोकरेज फर्मच्या मते आर्थिक वर्ष 2023-26 मध्ये या कंपनीची कमाई 22 टक्के CAGR दराने वाढू शकते. कंपनीच्या आर्थिक कामगिरीची वाढ लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्मने किलपेस्ट इंडिया कंपनीच्या स्टॉकवर 1184 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Killpest Share Price today on 16 September 2023.

हॅशटॅग्स

Killpest Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x