15 May 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर! मल्टिबॅगर हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्स स्प्लिट होणार, शेअर्स स्वस्त होताच फायदा घ्या

HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल लिमिटेड या सरकारी मालकीच्या संरक्षण कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. नुकताच या कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. यात कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 5 रुपये असलेल्या दोन भागात विभाजित करणार आहे.

मागील 5 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. स्टॉकब्रोकर फर्म प्रभुदास लीलाधरने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 2,266 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.13 टक्के वाढीसह 1,929.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

प्रभुदास लिल्लाधर फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी भारतीय हवाई दलाला लष्करी विमानांचा प्राथमिक पुरवठा करणारी कंपनी म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. भारतीय हवाई दलाचे वाढते सामर्थ्य आणि आधुनिकीकरणात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी खूप मोठे योगदान देत आहे.

या कंपनीने स्वदेशी विमानांच्या खरेदीबाबत भारत सरकारची ऑर्डर स्वीकारली आहे. याव्यतिरिक्त, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीकडे 5 वर्षांच्या पाइपलाइनसह 2 ट्रिलियन रुपये मूल्याचे विविध काम प्रलंबित आहे. आणि सध्या कंपनीच्या ऑर्डर बुकचे मूल्य 818 अब्ज रुपये आहे.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने 814 कोटी रुपये कन्सोलिडेटेड निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच जून तिमाहीत कंपनीने 620 कोटी रुपये कन्सोलिडेटेड निव्वळ नफा कमावला होता.

तथापि चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 71 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीने 2,831 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.जून तिमाहीत कंपनीच ऑपरेशनल महसूल 8 टक्क्यांच्या वाढीसह 3,915.35 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीची स्थापना 1964 साली हिंदुस्तान एअरक्राफ्ट्स अँड एरोनॉटिक्स इंडिया कंपनीच्या विलीनीकरणानंतर करण्यात आली होती. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठी स्वदेशी लढाऊ विमानांचे उत्पादक कंपनी मानली जाते. ही कंपनी विमान, हेलिकॉप्टर, एरो – इंजिन, एव्ही ओनिक्स, अॅक्सेसरीज आणि एरोस्पेस डिझाइन, विकास, उत्पादन, दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग या सर्व सेवाद्वारे भारतीय संरक्षण दलाच्या गरजांची पूर्तता करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price today on 02 October 2023.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x