21 May 2024 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

गांधी जयंतीच्या दिवशीच मोदींनी राजस्थानमध्ये प्रचारात हिंदू-मुस्लिम मुद्दा पेटवला, लोकांना गळा चिरण्याच्या घटनेची आठवण करून दिली

Prime Minister Narendra Modi

Bihar Caste Survey | राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी कन्हैलाल हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चित्तौडगडयेथील सभेत गेहलोत सरकारला घेराव घालत या घटनेची आठवण लोकांना करून दिली.

राजस्थानमधील लोक शांततेत तीज सण साजरा करू शकत नाहीत, दंगल कधी होईल हे त्यांना माहित नाही. मोदी पुढे म्हणाले की, भाजपचे सरकार स्थापन होईल आणि दंगली रोखल्या जातील. पंतप्रधान म्हणाले की, जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करू न शकणारे कॉंग्रेस सरकार हटविणे खूप महत्वाचे आहे. विशेष म्हणजे मोदींच्या याच विधानानंतर समाज माध्यमांवर नेटिझन्स त्यांना गुजरात दंगल आणि मणिपूरची आठवण करून देतं आहेत.

चित्तौडगडमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदीयांनी महिला सुरक्षा, भ्रष्टाचारापासून कन्हैयालाल हत्येपर्यंतच्या मुद्द्यांवर गेहलोत सरकारला घेरले. “तुम्हीच सांगा, उदयपूरमध्ये जे घडलं, त्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती.

शत्रूवर फसवणुकीने हल्ला न करण्याची परंपरा जगणाऱ्या राजस्थानच्या मातीवर एवढं मोठं पाप घडलं. कपडे शिवण्याच्या बहाण्याने लोक न घाबरता टेलरचा गळा चिरतात. ते व्हिडिओ बनवतात आणि अभिमानाने व्हायरल करतात. काँग्रेस सरकारलाही व्होट बँकेची चिंता सतावत आहे. राजस्थानच्या वीर धाराबद्दल काँग्रेसने जगासमोर कोणती प्रतिमा मांडली? असं मोदी म्हणाले.

राजस्थानमध्ये कोणताही सण शांततेत साजरा करणे शक्य नाही, दंगली कधी उसळतील, संचारबंदी केव्हा लागू होईल, कुणास ठाऊक नाही. सामान्य माणसाला जीवाची, व्यापाऱ्याला व्यवसायाची आणि कामगाराला कामाची चिंता आहे, असे वातावरण काँग्रेसने राजस्थानमध्ये निर्माण केले आहे. हे वातावरण बदलायला हवं. दंगलखोर असो वा गुन्हेगार, हे फक्त भाजप सरकारच दुरुस्त करू शकते. हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यामुळे भाजप येऊन दंगल ी थांबवेल, असे लोक म्हणत आहेत.

News Title : Prime Minister Narendra Modi said on Kanhaiya Lal murder in Chittorgarh Rajasthan 02 October 2023.

हॅशटॅग्स

#Prime Minister Narendra Modi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x