17 May 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Tata Steel Vs Jindal Steel Share | टाटा स्टील की जिंदाल स्टील शेअर बेस्ट? कोणता शेअरमधून होईल कमाई? परतावा तपासून घ्या?

Jindal Steel Share Price

Tata Steel Vs Jindal Steel Share | जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह 683 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 68065 कोटी रुपये आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 287 टक्के नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.066 टक्के घसरणीसह 678.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 एप्रिल 2020 रोजी 63 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून गुंतवणूकदारांनी तब्बल 1100 टक्के नफा कमावला आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28 जानेवारी 2000 रोजी 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जे आता 683 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

या काळात गुंतवणूकदारांनी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरमधून 12990 टक्के नफा कमावला आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 722 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 424 रुपये होती.

जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीने छत्तीसगड राज्यात गारे पाल्मा या कोळशाच्या खाणीतून उत्पादन सुरू केली आहे. या कंपनीला आपल्या गरजांसाठी लागणारा कच्चा माल लागते, त्यादृष्टीने हे खूप महत्त्वाचे पाऊल मानले जाते. छत्तीसगड राज्यातील ही खाण जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीला रायगड इंटिग्रेटेड स्टील प्लांटच्या विस्तारात देखील सहाय्य करेल. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या रायगड प्लांटची क्षमता 3.6 एमटीपीए आहे. जी वार्षिक 9.6 दशलक्ष टनांपर्यंत वाढणार आहे.

जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या रायगड प्लांटच्या विस्तारामुळे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेला मोठी मदत मिळणार आहे. जेएसपीएल कंपनी स्वदेशी कोळशाचा वापर करून भारतामध्ये आपली स्टील उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 265 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Vs Jindal Steel Share Price today on 05 October 2023.

हॅशटॅग्स

Jindal Steel Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x