20 May 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
x

Kama Holdings Share Price | श्रीमंत केलं या शेअरने! कामा होल्डिंग्ज शेअरने 64000% परतावा दिला, 1 लाखाचे झाले 6.4 कोटी रुपये

Kama Holdings Share Price

Kama Holdings Share Price | कामा होल्डिंग्ज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवरून वाढून 15000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत कामा होल्डिंग्ज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 64000 टक्के परतावा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.

कामा होल्डिंग्ज कंपनी आपल्या शेअर धारकांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आता कंपनीने बोनस शेअर्सची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी कामा होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 2.96 टक्के वाढीसह 15,908.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कामा होल्डिंग्ज कंपनीच्या संचालक मंडळाने गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी 17 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. कामा होल्डिंग्ज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10210 कोटी रुपये आहे. कामा होल्डिंग्ज कंपनीने 2023 या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये 82 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला आहे. यापूर्वी कंपनीने मार्च 2023 मध्ये आपल्या शेअर धारकांना 84 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला आहे. कामा होल्डिंग्ज कंपनीने आपल्या शेअर धारकांना 64000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

31 ऑक्टोबर 2003 रोजी कामा होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 24.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 15910 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. कामा होल्डिंग्ज कंपनीच्या शेअर्सनी मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 64,930 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी कामा होल्डिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.5 कोटी रुपये झाले असते.

मागील 3 वर्षांत कामा होल्डिंग्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 225 टक्के परतावा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 16800 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 11750.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kama Holdings Share Price 07 October 2023.

हॅशटॅग्स

Kama Holdings Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x