20 May 2024 10:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

NCC Share Price | कुबेर परत पावणार? गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअरवर तज्ज्ञांनी नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली

NCC Share Price

NCC Share Price | एनसीसी लिमिटेड या आघाडीच्या बांधकाम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने केवळ दीर्घकाळातच नाही तर अल्पावधीत देखील आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 22 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. Multibagger Stocks

मात्र शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरवर जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी एनसीसी लिमिटेड स्टॉक 2.36 टक्के घसरणीसह 155.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

ब्रोकरेज फर्म हेम सिक्युरिटीज फर्मने एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 213 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 5 ऑक्टोबर 2001 रोजी NCC कंपनीचे शेअर्स 87 पैशांवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 155 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच ज्यां लोकांनी 2001 मध्ये एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 57000 रुपये लावले होते, ते गुंतवणुकदार आता करोडपती झाले आहेत.

मागील वर्षी 21 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 71.10 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर अवघ्या 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 149 टक्क्यांनी वाढली होती. 1 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 176.95 रुपये किमतीवर पोहचले होते.

एनसीसी लिमिटेड ही कंपनी मुख्यतः बांधकाम, सिंचन, खाणकाम, रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करते. घरगुती ब्रोकरेज फर्म हेम सिक्युरिटीजने एनसीसी लिमिटेड कंपनीच्या वाढत्या ऑर्डर आणि काम पूर्ण होण्याचा वेग लक्षात घेऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरवर 213 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. जून 2023 तिमाहीत एनसीसी लिमिटेड कंपनीने 31.89 टक्के वाढीसह 4380 रुपये एकत्रित महसूल संकलित केला होता.

कंपनीने 33 टक्क्यांच्या वाढीसह 409 कोटी रुपये नफा कमावला होता. जून 2023 तिमाहीत एनसीसी लिमिटेड कंपनीला 8154 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या होत्या. वार्षिक आधारावर कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 83 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सध्या या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 54110 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NCC Share Price NSE 21 October 2023.

हॅशटॅग्स

#NCC Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x