18 May 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Stocks in Focus | होय! सरकारी कॅनरा बँकेच्या FD पेक्षा चौपट परतावा कॅनरा बँक शेअर 3 महिन्यात देईल

Stocks in Focus

Stocks in Focus | सरकारी बँकांनी सप्टेंबर 2023 तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सरकारी बँकांच्या नफ्यात आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. शेअर बाजारात अनेक सरकारी बँकांचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, मात्र तज्ञांनी अल्पकालीन गुंतवणुकीसाठी कॅनरा बँकेच्या शेअरची निवड केली आहे.

तज्ञांनी कॅनरा बँकेचे शेअर्स 3 महिन्यांसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 387.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कॅनरा बँकेने 26 ऑक्टोबर 2023 रोजी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 390 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. तर 1 नोव्हेंबर 2023 रोजी हा शेअर 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 383 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने पुढील 3 महिन्यांच्या कालावधीसाठी कॅनरा बँक स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

ब्रोकरेज फर्मने कॅनरा बँकेच्या स्टॉकवर पुढील तीन महिन्यांसाठी 430 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि गुंतवणूक करताना तज्ञांनी 358 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 377-384 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. ही लक्ष्य किंमत मागील बंद किमतीच्या तुलनेत 20 टक्के अधिक आहे.

कॅनरा बँकेने नुकताच आपले, दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबर 2023 तिमाहीत कॅनरा बँकेने 10.30 टक्के वाढीसह 7616 कोटी रुपये ऑपरेटींग नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कॅनरा बँकेच्या निव्वळ नफ्यात 42.81 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कॅनरा बँकेने 3606 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कॅनरा बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 19.76 टक्के वाढीसह 8903 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

कॅनरा बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारल्याने बँकेच्या एनपीएमध्ये घट नोंदवली गेली आहे. वार्षिक आधारावर कॅनडा बँकेचा ग्रॉस एनपीए 161 बेसिस पॉइंट्सच्या घसरणीसह 4.76 टक्केवर आला आहे. कॅनरा बँकेचा निव्वळ एनपीए 78 बेसिस पॉईंटनच्या घसरणीसह 1.41 टक्केवर आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 03 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x