21 May 2024 7:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअर व्होडाफोन आयडियाचे शेअर्स उच्चांक किंमतीवर पोहोचले, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड या कर्जबाजारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.51 टक्क्यांच्या वाढीसह 14.37 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मते आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 74.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

31 मार्च 2023 रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.70 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमती वरून हा स्टॉक 141 टक्क्यांनी वाढला आहे. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के घसरणीसह 13.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीला HDFC बँकेने आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली आहे. या बँकेने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला परवाना शुल्क भरण्यासाठी आणि 5G स्पेक्ट्रमचे दायित्वे पूर्ण करण्यासाठी 2 हजार कोटी रुपये कर्ज देण्याची घोषणा केली आहे. या कर्जाची मुदत दोन वर्षां असेल.

यापूर्वी आर्थिक वर्ष 2022 आणि आर्थिक वर्ष 2023 साठी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने परवाना शुल्क म्हणून 350 कोटी रुपये आणि स्पेक्ट्रम वापर शुल्क म्हणून 1,700 कोटी रुपये जमा केले आहेत. आता कंपनी गुंतवणूकदारांकडून इक्विटी फंडिंग करण्याचा विचार करत आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीने नुकताच आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, 4G नेटवर्क आणि 5G सेवेची व्याप्ती वाढवण्यासाठी कंपनी मोठा भांडवली निधी जमा करण्याचा प्रयत्न करत आहे.

कंपनीने आपल्या 5G सेवा प्रदान करण्याच्या धोरणाला अंतिम रूप देण्यासाठी विविध नेटवर्क आणि गुंतवणूकदारांसोबत चर्चा सुरू केली आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीत 8,737.9 कोटी रुपये निव्वळ कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कालावधीत कंपनीने 7,595.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाही व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने एकत्रित आधारावर ऑपरेशन्समधून 10,716.3 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 10,655.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी सध्या खूप मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे, आणि कंपनीचे कर्ज खूप वाढले आहे. 30 जून 2023 पर्यंत व्होडाफोन आयडिया कंपनीवर 2.11 लाख कोटी रुपये कर्ज आहे.

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंतचे सर्व वैधानिक देय कर भरले आहेत. आता ते मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 च्या तिसऱ्या तिमाहीतील परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्कची थकबाकी पूर्वीच्या योजनेपेक्षा अधिक वेगाने भरत आहे.

कंपनीच्या प्रवर्तक समूहाने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीमध्ये 2000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. पेमेंट दायित्वे हाताळण्यासाठी आर्थिक सहाय्याची आवश्यकता असल्यास प्रवर्तक समूह 2000 कोटी रुपये भांडावल देण्यास तयार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE 06 November 2023.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x