17 May 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजी, तज्ज्ञांनी जाहीर केली नवीन टार्गेट प्राईस, किती फायदा?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 2 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याच दिवशी कंपनीने आपले सप्टेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल देखील जाहीर केले होते. त्यानंतर सुझलॉन एनर्जी स्टॉक तेजीत आला.

सुझलॉन एनर्जी स्टॉकने या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी देखील सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.42 टक्के वाढीसह 36.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले मजबूत तिमाही निकाल जाहीर करून गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 102.29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात कंपनीने 56.47 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या खर्चात कपात केल्यामुळे कंपनीचा निव्वळ नफा वाढला आहे.

सप्टेंबर 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 1417 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 37 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 36.16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 1 वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 320 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात आतापर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर 241 टक्के वाढले आहेत. 3 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2020 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 35 रुपयेच्या पार गेले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 07 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x