18 May 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या
x

Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच लाँच होणार, शेअर ग्रे मार्केटमध्ये मजबूत तेजीत, मोठी संधी सोडू नका

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | शेअर बाजारातील गुंतवणुकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो, असे मत तज्ञांनी मांडले आहे. IPO शेअर च्या किंमत बँडबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती जाहीर केली नाही.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 275 रुपये GMP वर ट्रेड करत आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअर्सची प्रीमियम किंमत 40 रुपयेवरून वाढून 275 रुपयेवर पोहचली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 280 रुपये किमतीवर पोहोचली आहे. तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मजबूत प्रीमियम वाढीसह शेअर बाजारात लिस्ट होऊ शकतात.

मीडिया रिपोर्टनुसार, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने मॉर्गन स्टॅनली, ब्लॅकरॉक आणि इतर काही अमेरिकन हेज फंड कंपन्यासोबत आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनी विविध गुंतवणूक संस्थाच्या माध्यमातून IPO मध्ये 2.5 बिलियन डॉलर्स गुंतवणुकीसाठी चर्चा करत आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण बाजार मूल्यांकन 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयात 16300 कोटी रुपये आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची मूळ कंपनी असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आयपीओ लाँच होण्यापूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे 9.9 टक्के भाग भांडवल विकून 1614 कोटी रुपये कमावले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO GMP Today 14 November 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x