16 May 2024 8:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत, पण म्युचुअल फंडानी मोठ्या प्रमाणात सुझलॉन शेअर्स विकले, नेमकं कारण काय?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 265 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.

म्युच्युअल फंडानी ऑक्टोबर 2023 मध्ये 13.36 कोटी शेअर्स विकून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमधील जबरदस्त तेजीचा फायदा घेतला. आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.65 टक्के वाढीसह 38.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑक्टोबर 2023 मध्ये HDFC AMC आणि बंधन MF सारख्या म्युच्युअल फंडांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स विकून नफा वसुली केली आहे. सप्टेंबर 2023मध्ये म्युच्युअल फंडानी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 62.89 कोटी शेअर्स होल्ड केले होते. मागील एका महिन्यात म्युचुअल फंडानी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर विकून आपले प्रमाण 49.53 कोटी शेअर्सवर आणले आहे.

सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत म्युच्युअल फंडांनी सुझलॉन एनर्जी कंपनीतील आपला वाटा QoQ आधारावर 4.98 टक्के वाढून कमी करून 4.7 टक्केवर आणला आहे. तथापि, FII ने सुझलॉन एनर्जी कंपनीतील आपला वाटा वाढवून 10.88 टक्केवर आणला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 38.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 368.48 टक्के वाढली आहे. या काळात शेअरची किंमत 8.10 रुपयेवरून वाढून 38.65 रुपयेवर पोहचली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 644.70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 14 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x