17 May 2024 8:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स रॉकेट वेगात परतावा देणार? 3 कारण नोट करा, 12 महिन्यात असं घडलं

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षभरात ज्या गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी केला आहे, ते लोक आता मालामाल झाले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 42.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

यापूर्वी 8 सप्टेंबर 2011 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे या किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.96 टक्के घसरणीसह 40.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले कर्ज झपाट्याने कमी केले आहे. मागील वर्षी जून 2022 तिमाहीपर्यंत या कंपनीवर 3,300 कोटी रुपये कर्ज होते. ऑक्टोबर 2022 मध्ये या कंपनीने राइट्स इश्यूद्वारे 1,200 कोटी रुपये भांडवल उभारणी केली, आणि आपले कर्ज फेडले होते.

सप्टेंबर 2022 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीवर 2,722 कोटी रुपये कर्ज होते. तर डिसेंबर 2022 तिमाहीत हे कर्ज 700 कोटी रुपयांनी कमी होऊन 2,035 कोटी रुपयेवर आले होते.

मार्च 2023 तिमाहीत या कंपनीने आपले कर्ज निम्म्याने कमी करून 1,180 कोटी रुपयेवर आणले होते. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले 80 टक्के कर्ज परतफेड केले आहे. 2023 या वर्षी ऑगस्टमध्ये क्यूआयपीद्वारे कंपनीने 2,000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. आणि तब्बल 15 वर्षानंतर सुझलॉन एनर्जी कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली. आता सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीकडे 600 कोटी रुपये कॅश शिल्लक आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीला मागील काही महिन्यापासून सातत्याने नवनवीन ऑर्डर्स मिळत आहे. मागील वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीसोबत 48.3 मेगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचा करार केला होता. या वर्षी मे 2023 महिन्यात टोरेंट पॉवर कंपनीने देखील सुझलॉन एनर्जी कंपनीला 300 मेगावॅट क्षमतेची मोठी ऑर्डर दिली होती. ऑगस्ट 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीला O2 पॉवर लिमिटेड कंपनीने 201.6 मेगावॅटची ऑर्डर दिली होती.

15 नोव्हेंबर 2023 रोजी मॉर्गन स्टॅन्ले फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स त्यांच्या ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्स MSCI मध्ये सामील केले आहेत. एमएससीआय इंडेक्समध्ये स्टॉक सामील झाल्याने सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये 1,600 ते 2,400 कोटी रुपये गुंतवणुकीचे आगमन होऊ शकते. ही गुंतवणूक पॅसिव्ह फंडांद्वारे येण्याची शक्यता आहे.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 431 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 44 टक्के मजबूत झाले आहेत. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 391 टक्के वाढवले आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 431 टक्के मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 20 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x