17 May 2024 9:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Gautam Adani | बंगाली बाणा! ममता बॅनर्जींचा अदानी ग्रुपला धक्का, 25 हजार कोटींचा ताजपूर बंदर प्रकल्प काढून घेतला

Gautam Adani

Gautam Adani | पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने गौतम अदानी यांना मोठा झटका दिला आहे. ममता सरकारने अदानी समूहाकडून 25 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प काढून घेतला आहे. अदानी समूहाला पश्चिम बंगालमधील ताजपूर बंदर विकसित करायचे होते, मात्र आता या प्रकल्पासाठी नवीन निविदा काढण्यात आली आहे.

विरोधक सुरुवातीपासूनच गौतम अदानी यांच्यावर टीका करत आहेत. गौतम अदानी यांच्या एनडीए कनेक्शनबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. एकीकडे गौतम अदानीवर हल्ला करत आहेत, तर दुसरीकडे पश्चिम बंगालचे मोठे प्रकल्पही अदानी समूहाकडे सोपवले जात आहेत, असा आरोपही ममता बॅनर्जी यांच्यावर करण्यात आला. आता ममता बॅनर्जी यांनी गौतम अदानींपासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

ताजपूर बंदराचा विकास करण्यासाठी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडला आशयपत्र देण्याच्या प्रस्तावाला ममता सरकारने नुकतीच मंजुरी दिली होती. २५ हजार कोटींचा हा प्रकल्प आता अदानी समूहाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

ममता सरकार लवकरच निविदा काढणार
ममता बॅनर्जी सरकार लवकरच या बंदरासाठी नवीन निविदा काढणार आहे. लवकरच लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. गौतम अदानी यांनी 2022 मध्ये बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये भाग घेतला होता. त्याचवेळी त्यांनी येथे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते, पण आता ममतांनी अदानी समूहाला मोठा धक्का दिला आहे.

असं का घडलं?
विरोधी पक्षांच्या आरोपांमुळे ममता बॅनर्जी यांनी असा निर्णय घेतल्याचा दावा अनेकजण करत आहेत. महुआ मोइत्रा यांनी पैसे घेऊन अदानी समूहाविरोधात प्रश्न उपस्थित केल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. याच कारणास्तव ममता सरकारने असा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील कोणत्याही अधिकाऱ्याने याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gautam Adani Tajpur Port Tender Case 22 November 2023.

हॅशटॅग्स

Gautam adani(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x