18 May 2024 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Mamaearth Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मामाअर्थ शेअरने 2 दिवसात 34% परतावा दिला, फायद्यासाठी वेळीच एंट्री घ्यावी का?

Mamaearth Share Price

Mamaearth Share Price | मामाअर्थ कंपनीची मूळ कंपनी असलेल्या होनासा कंझ्युमर कंपनीच्या शेअर्समध्ये गुरूवारी 20 टक्क्यांची प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीसह 422.50 रुपये किमतीवर पोहचले होते. | Honasa Consumer Share Price

होनासा कंझ्युमर कंपनीने नुकतेच आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मामाअर्थ ब्रँडची मूळ कंपनी असलेल्या होनासा कंझ्युमर कंपनीचा दावा आहे की, ते विषमुक्त सौंदर्य प्रसाधने बनवतात. सध्या हा शेअर 13.89% वाढीसह 482.60 रुपयांवर ट्रेड करत आहे.

सप्टेंबर तिमाहीत होनासा कंझ्युमर कंपनीने 93 टक्के वाढीसह 29.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 15.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीच्या महसुलातही भरघोस वाढ झाली आहे, या तिमाहीत कंपनीने 21 टक्के वाढीसह 496 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

मामाअर्थ कंपनीचे शेअर्स 7 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO शेअरची इश्यू किंमत 324 रुपये प्रति शेअर होती. तर कंपनीचे शेअर्स 2 टक्के प्रीमियम वाढीसह 330 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 423.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, तज्ञांनी होनासा कंझ्युमर कंपनीचे शेअर्स, ‘स्टॉक ऑन हाय कन्व्हिक्शन बाय’ म्हणून निवडले आहे. होनासा कंझ्युमर कंपनीचा मूळ मामाअर्थ ब्रँड भारतीय तसेच परकीय बाजारात महिला, मुले आणि पुरुषांसाठी सौंदर्य प्रसाधने उत्पादने बनवण्याचे काम करते.

ही कंपनी आपली सर्व उत्पादने ऑर्गेनिक पद्धतीने बनवण्याचा दावा करते. शेअर बाजारात कंपनी सूचीबद्ध झाल्यापासुन कंपनीच्या उत्पादनांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mamaearth Share Price NSE 24 November 2023.

हॅशटॅग्स

Mamaearth Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x