15 May 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा
x

ITD Cementation Share Price | अल्पावधीत पैसा ! ITD सिमेंटेशन शेअरने 1 महिन्यात दिला 54% परतावा, लवकरच मल्टिबॅगर?

ITD Cementation Share Price

ITD Cementation Share Price | आयटीडी सिमेंटेशन या नागरी बांधकाम उद्योगाशी संबंधित कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 305 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शुक्रवारी या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 1001 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी आयटीडी सिमेंटेशन स्टॉक 2.20 टक्के वाढीसह 276.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आयटीडी सिमेंटेशन कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीला आंध्र प्रदेश राज्यातून एक कंत्राट मिळाले आहे. आयटीडी सिमेंटेशन कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार कळवले आहे की, त्यांना 500 मेगावॅट जलविद्युत, पंप स्टोरेज प्रकल्पाचे सिव्हिल आणि हायड्रो मेकॅनिकल कामांसंबंधित कंत्राट मिळाले आहे. हा प्रकल्प आंध्र प्रदेश राज्यात असून त्याचे एकूण मूल्य 1001 कोटी रुपये आहे.

आयटीडी सिमेंटेशन कंपनीने यापूर्वी बांगलादेशमध्ये 10 ऑगस्ट 2023 रोजी ट्रान्सरेल लाइटिंगसह संयुक्त उपक्रमाचा एक करार केला होता. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत आयटीडी सिमेंटेशन कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 22080 कोटी रुपये होता. 2023 या वर्षात आयटीडी सिमेंटेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 126.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 8 महिन्यांत ITD सिमेंटेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 190 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 97.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयटीडी सिमेंटेशन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 93.75 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ITD Cementation Share Price NSE 02 December 2023.

हॅशटॅग्स

ITD Cementation Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x