14 May 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक Buy करावा की Sell? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील?
x

Adani Gas Share Price | अदानी गृप शेअर्स तुफान तेजीत आले, अदानी टोटल गॅस शेअरने अल्पावधीत पैसे दुप्पट केले

Adani Gas Share Price

Adani Gas Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. दरम्यान अदानी समूहाबाबत काही सकारात्मक बातम्या आल्याने अदानी समूहाचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मागील 8 दिवसात अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 1,053.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 8.80 टक्के वाढीसह 1,146 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

वास्तविक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 530 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील 8 दिवसात या कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. म्हणजेच अवघ्या 8 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले आहेत. ज

तुम्ही 23 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले असते. ऑक्टोबर 2023 मध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 521.95 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते.

मागील काही दिवसांपासून अदानी समूहाबाबत अनेक मोठ्या सकारात्मक बातम्या आल्या आहेत. दरम्यान भाजप पक्षाने तीन राज्याच्या विधानसभा निवडणुका देखील जिंकल्या आहेत. निवडणुका पार पडताच हिंडेनबर्ग फर्मने अदानी समुहावर आर्थिक गैर व्यवहाराचा आरोप केला होता, ते सर्व खोटे निघाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील पुराव्याशिवाय अदानी समूहावर केलेले आरोप खरे मनाने योग्य नसल्याचे म्हटले होते.

सेबीचा अहवाल जाहीर होणे बाकी आहे, मात्र त्यातही अदानी समूहाबाबत फारसे काही नकारात्मक पाहायला मिळेल याची अपेक्षा कमी आहे. तीन राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड विजयामुळे अदानी समूहाचे शेअर्स अप्पर सर्किट तोडू लागले आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतात पुन्हा एकदा भाजप सरकार येण्याच्या शक्यतेनेही अदानी समूहाच्या शेअरमध्ये तेजी वाढवली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Gas Share Price NSE 07 December 2023.

हॅशटॅग्स

#Adani Total Gas Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x