13 May 2024 8:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

LIC Share Price | एलआयसी शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला, नेमकं कारण काय?

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअरबाबत अनेक गुंतवणूक सल्लागार सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ज्ञांनी एलआयसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कारण तज्ञांच्या मते, एलआयसी स्टॉक पुढील काही दिवसांत 10 टक्के वाढू शकतो.

गुंतवणूकदारांनी जर सध्याच्या किंमत पातळीवर एलआयसी स्टॉक खरेदी केला तर काही दिवसात त्यांना 10 टक्के नफा मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी एलआयसी स्टॉक 0.43 टक्के घसरणीसह 742.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ञांच्या मते, एलआयसी कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 10 टक्के वाढू शकतात. मागील 5 दिवसांत एलआयसी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 10 टक्के वाढवले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 748 रुपये किमतीवर पोहोचले होते.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.71 लाख कोटी रुपये आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहोचले होते, मात्र आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे.

मागील 6 महिन्यांत एलआयसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के नफा मिळवून दिला होता. या काळात एलआयसी स्टॉक 597 रुपयेवरून वाढून 748 रुपये किमतीवर पोहोचला होता. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून ओळखली जाते. मागील वर्षी 20 मे 2023 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 826 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले होते.

शेअर्स 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात
काही तज्ञांच्या मते एलआयसी कंपनीचे शेअर्स दीर्घ कालावधीमध्ये 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. LIC कंपनीच्या शेअरने तब्बल 11 महिन्यांनंतर 700 रुपये किंमत स्पर्श केली होती. नोव्हेंबर 2023 या महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 13 टक्के नफा कमावला आहे. एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे मुख्य कारण, कंपनीने जाहीर केलेली जीवन उत्सव ही नवीन योजना मानले जात आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE 07 December 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x