10 May 2024 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त
x

Multibagger Stocks | शेअरची किंमत 76 रुपये, वी विन शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करतोय, अल्पावधीत पैसा वाढतोय

Multibagger Stocks

Multibagger Stocks | वी विन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वी विन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 73.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह क्लोज झाले आहेत.

वी विन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी वी विन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 76.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

उत्तर प्रदेश राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता हेल्पलाइनची स्थापना आणि संचालन करण्याची ऑर्डर वी विन लिमिटेड कंपनीला दिली आहे. त्यामुळे या नॉन-इमर्जन्सी इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.

स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार वी विन लिमिटेड कंपनीला उत्तर प्रदेश डेव्हलपमेंट सिस्टम्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने उत्तर प्रदेश राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता हेल्पलाइन सुरू करण्याची आणि त्यांचे संचालन करण्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला कॉल सेंटर एजन्सीची निवड करायची आहे. या ऑर्डरचा एकूण कालावधी चार वर्षा असून तो पुढे जाऊन दोन वर्षांनी वाढवता ही येणार आहे. या ऑर्डर चे एकूण मुल्य 110.61 कोटी रुपये आहे.

वी विन लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 74.68 कोटी रुपये आहे. मागील सहा महिन्यांत वी विन लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के नफा कमावून दिला आहे. वार्षिक आधारे वी विन लिमिटेड कंपनीने 17 टक्क्यांच्या वाढीसह 48.79 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. त्याच कालावधीत कंपनीने 14 टक्क्यांच्या वाढीसह 2.40 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

वी विन लिमिटेड ही कंपनी कॉल सेंटर आणि सपोर्ट सेंटर सेवांसह ग्राहक संबंध व्यवस्थापन सेवा प्रदान करणारी आउटसोर्सिंग कंपनी आहे. ही कंपनी लीड जनरेशन, संपर्क केंद्र, ई-कॉमर्स व्यवस्थापन आणि एआय ऑपरेशन्स संबंधित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या सेवांच्या विक्रीतून 98 टक्के आणि इतर व्यवसायातून 2 टक्के कमाई करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment 20 December 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x