10 May 2024 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Post Office Interest Rate | खुशखबर! पोस्ट ऑफिस बचत योजनांचे व्याज दर बदलणार, किती वाढणार व्याजदर पहा

Post Office Interest Rate

Post Office Interest Rate | अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याबाबत मोदी सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते. यासंदर्भात अर्थ मंत्रालय आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीतील (जानेवारी ते मार्च) व्याजदरांचा आढावा घेणार आहे. वाढीव दर 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील.

दर तीन महिन्यांनी व्याजदरांचा आढावा
सरकार दर तीन महिन्यांनी अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेते. गेल्या वेळी ३० सप्टेंबर रोजी केवळ दोन योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती, तर अन्य श्रेणीच्या योजनांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. अशा तऱ्हेने उर्वरित योजनांमध्ये वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्यावेळी व्याजदरात कोणताही बदल झाले नाही
सध्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग, पीपीएफ, सुकन्या, ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रीय बचत पत्र अशा एकूण १२ प्रकारच्या अल्पबचत योजना सरकार चालवत आहे. गेल्या वेळी यातील बहुतांश बचत योजनांचे व्याजदर स्थिर ठेवण्यात आले होते. केवळ पाच वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेवरील व्याजदर ६.५ टक्क्यांवरून ६.७ टक्के करण्यात आला.

पीपीएफमध्ये तीन वर्षांपासून बदल नाही
1 एप्रिल 2020 पूर्वी देशात पीपीएफचा व्याजदर 7.9 टक्के होता. कोरोना काळात सरकारने एप्रिल-सप्टेंबर 2020 तिमाहीत अनेक बचत योजनांच्या व्याजदरात बदल करून त्यात कपात केली होती. तेव्हापासून पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्क्यांवर कायम आहे. दरम्यान, व्याजदरात अनेक बदल करण्यात आले, पण पीपीएफमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

यावेळी सरकार जवळपास चार वर्षांनंतर पीपीएफच्या व्याजदरात वाढ करू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपीएफच्या व्याजदरात फारशी वाढ न करण्याचे मुख्य कारण म्हणजे या योजनेत करोत्तर परतावा जास्त असतो. सर्वोच्च करश्रेणीच्या बाबतीत तो सुमारे १०.३२ टक्क्यांपर्यंत जातो. या पार्श् वभूमीवर व्याजदरात बदल केला जात नाही.

अर्थ मंत्रालयाचा निर्णय
पोस्ट ऑफिसच्या अल्पबचतीवर अर्थ मंत्रालय प्रत्येक तिमाहीसाठी दर जाहीर करते. अल्पबचत योजना वगळता बँका रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराच्या आधारे आपापल्या पद्धतीने एफडीवरील दर ठरवतात. अल्पबचत योजनांचा उद्देश सर्वसामान्यांना बचतीसाठी प्रोत्साहित करणे हा आहे. तसेच मासिक उत्पन्न योजना

‘या’ योजनांमध्ये वाढ शक्य
* योजना चालू व्याजदर

* बचत ठेव योजना: 4.0%
* 1 वर्षाची मुदत ठेव: 6.9%

* 5 वर्षांची मुदत ठेव : 7.5%
* 5 वर्षाची रिकरिंग डिपॉझिट स्कीम : 6.7%

* राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना: 7.7%
* पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम: 7.1%

* किसान विकास पत्र: 7.5%
* सुकन्या समृद्धी खाते योजना: 8.0%

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Interest Rate Updates Check Details 29 December 2023.

हॅशटॅग्स

#Post Office Interest Rate(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x